Total Pageviews

Friday, 6 October 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४४१

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४४१
भाऊंचा जिवलग बळवंतराव मेहेंदळे
भाऊ कुंजपुरा जिंकून पुढे कुरुक्षेत्री गेले पण तोपर्यंत अब्दाली यमुना पार होऊन दिल्ली आणि भाऊच्या मध्येच येऊन ठेपला. अब्दालीचा हा धाडसी निर्णय युद्ध त्याच्या बाजूने झुकण्यास फायद्याचा ठरला.
मराठे सुद्धा पानिपत येथे अब्दाली पासून अवघ्या ७-८ मैलावर येऊन थांबले. दोन्ही बाजूंच्या सैन्याने तोफा आपल्या छावणी बाहेर आणून ठेवल्या. अब्दाली आणि भाऊ दोघेहि एकमेकांची ताकद आजमावण्यासाठी छोट्या चकमकी घडवीत होते. तारीख ७ डिसेंबर, कार्तिक वद्य अमावस्या, नजिबखानच्या भावाने मराठ्यांच्या छावणीवर हल्ला चढविला. सुलतानखान ८-९ हजार रोहील्यांच्या फौजेसह मराठ्यांनवर येऊन थडकला. शत्रू जवळ आलेला पाहून मराठे संतापले आणि त्यांनी सुद्धा हर हर महादेवची सिंह गर्जना करीत त्वेषाने रोहील्यानवर हल्ला चढविला. बळवंतराव मेहेंदळे सुद्धा आपल्या तुकडीसह नागवी समशेर फिरवीत युद्ध मैदानावर आले. मेहेंदळे यांचा जोम पाहून मराठ्यांना जोर आला आणि त्यांनी रोहिल्यांना कापायला सुरुवात केले. लढाई चांगलीच रंगली. मराठी तोफखान्याच्या टप्प्यात असल्यामुळे अनेक रोहिले मारले गेले. या चकमकीत मराठ्यांची सरशी झाली होती पण त्याला बळवंतराव मेहेंदळेच्या मृत्यूचे गालबोट लागले. युद्ध मैदानात बेफाम होऊन लढणार्या मेहेंदळेनच्या छातीत गोळी लागली आणि ते घोडयाखाली पडले. काही रोहिले त्यांचे हिर कापण्यास पुढे सरसावले पण खंडेराव निंबाळकर आणि त्यांच्या काही सैनिकांनी मेहेंदळे यांचे मृत शरीर छावणीत आणले.
मेहेंदळे यांच्या मृत्यूमुळे युद्ध जिंकले तरी मराठ्यांचे मनोधैर्य पार खच्ची झाले होते.
संदर्भ: शेजवलकर

No comments:

Post a Comment