Total Pageviews

Thursday, 5 October 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४०७


 हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४०७

बुंदेलखंड इतिहास आणि मराठ्यांची महाराष्ट्राबाहेरची भरारी !
⋅ Prashant Shigwan
भाग २
छत्रसाल-एखाद्या ढाण्यावाघासारखा तो ताकदवान आणि तेवढाच शूर होता.तो एक कुशल घोडेस्वार होता. घोड्यावरून खेळला जाणारा पोलो या खेळात तो निष्णांत होता. चंपतराय च्या मृत्युनंतर हा मिर्झाराजे जयसिंग याच्या सैन्यात गेला. हो हाच मिर्जराजे जयसिग जो दक्षिणेस शिवाजी महाराज्याना संपवायला आला होता.

पुरंदरच्या वेढ्यात हा दिलेरखानाच्या हाताखाली १००० सैन्याची तुकडी घेऊन सोबत होता. पण दिलेर खानकडून मिळालेली तुच्छतेच्या वागणुकीला कंटाळला होता.त्याला शिवाजी महाराज्यांनी आदिल शहा आणि निजाम शहा यांच्या नाकावर टिच्चून शून्यातून उभे केलेले स्वराज्य त्याने पहिले तो इतका भरवला कि त्याला स्वत बादशहा कडे नोकरी करण्याची लाज वाटू लागली. त्याच्या मनात पुंन्हा स्वातंत्राची आग धग – धागु लागली.

शिवाजी राज्यांशी भेट- एका भल्या पहाटे तो आपल्या पत्नीला आणि आपल्या विश्वासू सहकार्यांना घेवून मोघलांच्या छावणीतून निघाला.तो थेट शिहगडाच्या पायथ्याशी आला. त्याने महाराज्यांची भेट घेतली. “तुम्ही आमच्या स्वतंत्र होण्याची आशा आहात. म्हणून सारा मुलुख पालथा घालून इकडे आलो आहे. मला तुमच्या बाजूने लढण्याची संधी द्या.”

महाराज्यांनी शांत बसून त्याच्याकडे पहिले त्याची तळमळ. त्याचे साहस त्यांना आवडले. ते त्याला म्हणाले ” माझ्या शूर मित्रा तुझ्या शत्रूंना नामव त्यांच्यावर विजय मिळव. मी माझ्या तलवारीने मोघालाना पाणी पाजले नमवले. तू तुझ्या प्रदेशात जा तिथे त्यांची धूळ दान कर मोघल अनेक ठिकाणी लढा देवू नाही शकत. आपण वेग वेगळे लढून त्यांना शह देवू शकतो. शत्रू तुझ्या किवा माझ्या मुलखात असताना आपण दोघे त्याचे लक्ष विभागून टाकू.”

महाराज्यांचा उपदेश घेवून छत्रसाल आपल्या प्रदेशात आला. त्या वेळी तो फक्त २१ वर्षाचाच होता. तेव्हा त्याच्याकडे फक्त ५ घोडेस्वार आणि २५ पायदळ आणि रिकामा खजाना एवढेच होते. त्याने परत सार्या संस्थानिकांना एकत्र करायला सुरुवात केली. बुन्देल्खान्दाची जनता तशीही औरंगजेबाच्या धर्म विरोधी कारवायांनी त्रस्त झाली होती.शुभाकर्ण,वीर बलदेव आणि बिच्चू हि येवून छत्रसाल ला मिळाला इतकेच नव्हे तर एक बाकीरखान नावाचा अफगाण बंडखोर हि त्यांना सामील झाला. पुढील २० वर्षात छत्रसाल इतका बलाढ्य झाला कि औरंगजेब ने पाठवलेल्या सार्या सरदाराना त्याने धूळ चारली.

१७२० साली सय्यद बंधूंच्या ऱ्हासानंतर महमदशहा गादीवर आला. या वेळी छत्रसाल ७० च्या पुढे पोचला होता. महमदशाने आपला सेनापती बंगश ला छत्रसाल चा पूर्ण बिमोड करायला पाठवले.१७२१ च्या मी महिन्यात त्याने दिलेर खानच्या नेतृत्व्हाखाली एक फौज पाठवली पण छत्रसाल ने त्याचा धुव्वा उडवला. मग बंगश स्वत्त चालून आला. म्हातार्या छत्रसाल ने त्याला अशी काही झुंज दिली कि बंगाशाला आपली मोहीम ६ महिन्यासाठी मागे घ्यावी लागली. छत्रसाल ने त्याचा फायदा घेत पाटण्या पर्यंत मुसंडी मारली.

त्यानंतर ६ वर्ष मोघल सत्ता छत्रसाल च्या वाट्याला गेली नाही. १७२७ साली पुन्हा बंकाश छत्रसाल वर चालून आला पण यावेळी त्याने मोठा फौज फाटा जमवला. किल्ल्यावरील तोफा काढून त्या मोहिमेत वापरल्या. त्याने सारा बुंदेलखंड व्यापला छत्रसाल च्या गाभ्यावरच घात केला. तुंबळ युद्ध झाले दोन्हीकडे मोठी हानी झाली. छत्रसाल ला किल्ला सोडून जैतापूर जवळच्या जंगलाचा आधार घ्यावा लागला.

No comments:

Post a Comment