हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४३४
राजगड लढ़वीणारे संताजी सिलिम्ब्कर
१७०३ चा पावसाळा संपला आणि पुण्यास छावणीकरुन राहणारा बादशाह राजगडाच्या रोखाने निघाला. राजगडाचा रास्ता तयार करण्यासाठी हजारो कामगार सतत दोन महीने झटत होते. बादशाह राजगडांस येउन वेढा घालून बसला. हमिद्दुधीन खान आणि तरबियत खान यांच्यावर किल्ला काबिज करण्याची जबाबदारी बादशाहने सोपविली होती. मोगली फौजेने दमदमे उभारून गडावर तोफांचा मारा सुरु केला. खुद्द औरंगजेबाची छावणी सुवेळा माची समोर होती. गडाच्या शिबंदिवर संताजी सिलिम्ब्कर होते. राजगड परक्रमाने लढ़वित असताना संताजी स्वामीकार्यावर ठार झाले. आज सुवेळा माचीच्या तटातिल गणेश शिल्पा समोरील वीरगळ ही संताजी सिलिम्ब्कर यांची असावी.
संताजी सिलिम्ब्कर यांचा पराक्रमाची साक्ष देणारे ताराराणी यांचे एक पत्र आहे. या व्यतिरिक्त राजवाड़े यांनी सुद्धा मराठ्यांच्या इतिहासाची साधने यात संताजिंच्या पराक्रमाचा दाखला दिला आहे
No comments:
Post a Comment