Total Pageviews
Friday, 6 October 2023
हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४४२
हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४४२
स्वराज्याशी एकनिष्ठ राहिलेले साठम घराणे.
औरंगजेब दक्षिणेत चालून आला पण काही महिन्यातच त्याला उमगले की महाराजांच्या मृत्युनंतर सुद्धा सह्याद्री तितकाच किंबुहाना थोडा अधिकच अभेद्य आणि आक्रमक होता. औरंगजेबाने आदिलशाही आणि कुतुबशाही अवघ्या काही महिन्यातच फस्त केल्या आणि मग पुन्हा नव्या जोमाने तो स्वराज्यावर चालून आला. या वेळेस त्याला नशिबाची आणि काही गद्दारांची साथ लाभली. १६८९ हे वर्ष त्याला लाभदायक ठरले, या वर्षात त्याने मराठ्यांच्या राजाचा खुन केला, मराठ्यांची राजधानी जिंकली, आणि राज परिवार कैद केला. पण मराठ्यांचा एक राजा निसटला होता, त्याने पलायन करून थेट जिंजी गाठली. जिंजीतून तो राज्य कारभार करू लागला.
या महाराष्ट्रातील अनेक सरदार घराणी औरंगजेबाच्या पायावर लोटांगण घालीत होते पण अशी सुद्धा काही घराणी होती जे महाराजांच्या स्वराज्यावर निष्ठा ठेवून होते. संकटाच्या समयी त्यांची निष्ठा किंचित सुद्धा ढळली नाही. असेच एक घराणे होते साठम घराणे.
साठम घराण्याचा पराक्रम ताराराणी यांच्या एका पत्रातून वाचायला मिळतो. औरंगजेब पन्हाळ्याला वेढा घालून बसला असता एसोजी साठम आणि सूर्याजी साठम (पाच हजारी) या दोन शूरांनी मर्दुमगीची शर्थ केली.
साठम घराण्यातील माणकोजी, हिरोजी, बापूजी, प्रतापजी या शूरांनी पावनगड आणि पन्हाळगडावर अतिशय मोलाची कामगिरी केली होती.
संदर्भ: डॉ. सदाशिव शिवदे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment