बुंदेलखंड मराठ्यांच्या इतिहासातील महत्वाचे राज्य. कारण याच बुंदेलखंडाने मराठ्यांना महाराष्ट्राबाहेर आपले राज्य वाढवून दिल्लीपर्यंत मजल मारण्यासाठी मदत केली. मग कसे आहे हे बुंदेलखंड जे मराठा इतिहासात प्रचंड उलाढाल केली ते कसे आहे ते पाहू.
प्रदेश-बुंदेलखंड हा मुलुख विन्ध्य पर्वतापासून उतरत यमुना नदीपर्यंत गेला आहे. या प्रदेशात झाशी,ओर्चा ,पन्ना , लांदा, रेवा अशी लहानमोठी संस्थाने येतात. हा प्रदेश वैराण आणि खडकाळ आहे. त्या कळतो तो दात जंगलांनी व्यापला होता. अनेक डोंगराच्या माथ्यावर बुंदेले आणि मराठ्यांनी भक्कम दुर्ग बांधले होते. पण १८५७ च्या क्रांतीने इंग्रज इतके घाबरले कि त्यांनी त्यातले बरेचसे दुर्ग उद्वस्थ केले.
इतिहास- या प्रदेशाचे नाव तेतील मूळ बुंदेला जमातीवरून पडले.हि गाधीवळ राजपुतांची जमात होती. कित्तेक दशके त्यांनी मोघालांशी संघर्ष केला. शेवटी जहागीर आणि शहजान च्या च्या काळात त्यांना नामावण्यात आले.स्तानिक राजांनी मोघालांचे स्वामित्व स्वीकारले. मोघाळणी त्यांना लहान लहान राज्यांचे राजे म्हणून मिरवण्यास परवानगी दिली.
पण मेहवाच्या दऱ्या-खोर्याच्या जाळ्याने भरलेल्या लहानशा संस्थानाचा राजा चंपतरायने आपल्या मुलासह मोघालांचे स्वमित्व्हा मानण्यास नकार दिला. या राजाचा मुलगा होता छत्रसाल! चंपतराय ने तर सरळ सरळ शहजान विरोधातच बंड पुकारले. त्याने मोघलांच्या कित्तेक ठाण्यांवर छापे मारले. मोघल काही स्थानिक मंडलिक राज्यांच्या मदतीने ते चंपतराय ला संपवायचे ठरवले पण चंपतराय ने त्यांना दाद लागून दिली नाही अश्या प्रकारे कितेक वर्ष युद्ध केल्यानंतर चंपतराय ने मोघालांशी संधान साधले.
चंपतराय ला दिल्लीत बोलावून शाही चाकरीत घेण्यात आले. 1656 च्या अफगाणिस्थानातील कंधार वेढ्यातला तो एक प्रमुख सेनापती होता. पण नंतर फितुरीच्या आरोपावरून त्याला त्याची जहागिरी काढून घेण्यात आली. तो परत बंडाच्या मार्गाला लागला. अखेर त्याला विश्वासघात करून मारण्यात आले. त्याची पत्नी त्याच्या मदतीला आली तिलाही मारण्यात आले. त्या वेळी छत्रसाल केवळ ११ वर्षाचा होता त्याला ३ वडील भाऊ होते पुढे त्यांचे काय झाले याची इतिहासात नोंद नाही आहे.
No comments:
Post a Comment