Total Pageviews

Friday, 6 October 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४४६

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४४६

गुणाजी सावंतांनी काबीज केला सिद्धगड
शंभू राजांच्या हत्ये नंतर मुघल जास्तच आक्रमक बनले आणि त्यांनी भेदरलेल्या मराठ्यांचे किल्ले घेण्यास सुरुवात केली. शंभू राजे गेले आणि काही महिन्यात रायगड सुद्धा मुघलांनी सर केला. रायगड पडला आणि शंभू राजांचा कुटुंब कबिला जुल्फिकार खानच्या कैदेत सापडला. राजाराम आधीच निसटल्यामुळे बचावले पण त्यांच्यावर सुद्धा देश सोडून दक्षिणेत जाण्याची पाळी आली. एक राजा मारला गेला त्याचा वारस कैद झाला, दुसरा राजा देशोधडीला लागला त्याकारणाने आपल्याला कोणी वाली राहिला नाही असा समज करून घेऊन अनेक किल्लेदारांनी न झुंजता किल्ले मुघली सैन्याच्या हवाली केले. ही वस्तुस्थिती महाराष्ट्रात १७व्या शतकाच्या शेवटास होती.

राजाराम राजे सुखरूप जिंजींस पोचले त्यांनी तेथून राज्यकारभार चालविण्यास प्रारंभ केला. जिंजी ही मराठ्यांची नवीन राजधानी बनली तेथे त्यांच्या छत्रपतींनी स्वताचे नवीन अष्ट मंडळ निर्माण केले. दख्खनेत आपली पकड मजबूत करण्यासाठी त्यांनी रामचंद्रपंत अमात्य आणि शंकराजी नारायण यांच्या बरोबर संताजी आणि धनाजी या वीरांना ठेवले. या सर्वांनी मोहिमा काढून गेलेले किल्ले, मुलुख जिंकण्यास सुरुवात केली.

आपसूक मिळालेले किल्ले सुद्धा मुघलांना धड सांभाळता येईनात आणि मराठ्यांच्या गनिमी काव्य समोर तर त्यांचा निभाव लागणे कठीण होऊन बसले. असाच एक किल्ला सिद्धगड जो उत्तर कोकणात आहे तो शंकराजी नारायण यांचा विश्वासू हस्तक गुणाजी सावंत याने अचानक छापा मारून घेतला. या युद्धात गुणाजी सावंतांनी फारच मोलाची कामगिरी करून मुघल किल्लेदाराला आणि अनेक मुघली सैन्याला कापून काढले आणि अवघ्या काही घटकात किल्ला काबीज केला.

No comments:

Post a Comment