Total Pageviews

Friday, 6 October 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४३८


 हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४३८

राहुजी सोमनाथ स्वराज्याचा एक विश्वासू सेवक.
महाराजांनी आग्र्यास निघण्या आधी स्वराज्याचा चोख बंदोबस्थ केला होता. खुद्द राजधानीत आऊसाहेबांन बरोबर मोरोपंत आणि प्रतापराव गुजर होते. स्वराज्यात नुकताच दाखल केलेला तळकोकण मुलुख अजून सुद्धा अस्थिरच होता, त्याची जबाबदारी महाराजांनी राहुजी सोमनाथांवर सोपविली होती.

महाराज आग्र्यात अडकले असताना तळकोकणातल्या फोंडा किल्ल्याचा अपवाद वगळता एक सुद्धा ठाणे आदिलशह जिंकू शकला नाही, कारण या प्रांतावर राहुजींची पकड मजबूत बसली होती. राहुजी अनेक वेळा आक्रमक भूमिका सुद्धा घेत, याचे उदहरण त्यांनी तळकोकणातला रांगणा किल्ला काबीज करून दिले आहे. महाराज आग्र्यात बंधिस्त असताना असे धाडस करणे म्हणजे कमालच.

महाराज आग्र्याहून निसटून स्वराज्यात सुखरूप पोचले. लवकरच औरंगजेबाशी महाराजांनी तह केला आणि तहाच्या कलमानुसार शंभूराजांना मुघली मनसबदार करण्यात आले. शंभूराजांना औरंगाबादला पाठविले तेव्हा त्यांना सोबत करणार होते प्रतापराव आणि राहुजी. बादशाहने शंभूराजांना वर्हाडातील जहागीर बहाल केली, या जहागिरीच्या बंदोबस्तासाठी महाराजांनी राहुजी सोमनाथांच्या हाताखाली थोडे मराठी सैन्य ठेवले. पुढे महाराज आणि औरंगजेबाचा तह मोडला आणि एकच संघर्ष सुरु झाला. या संघर्षाची सुरुवात सुद्धा केली ती राहुजी सोमनाथांनी. राहुजींनी वर्हाडातील अनेक गावे लुटली आणि मुघली सैन्याच्या मनात एकच धडकी भरविली.

दक्षिण दिग्विजयासाठी निघण्या अगोदर रायगड राजधानीचा कारभार महाराजांनी सोयराबाई किंवा युवराजांवर न सोपवता तो राहुजींच्या हाती दिला.

संदर्भ: शि.प. सं, जेधे शक, सभा

No comments:

Post a Comment