Total Pageviews

Friday, 6 October 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४४३


 हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४४३

नारोजी त्रिंबक यांची शौर्यगाथा
औरंगजेबाने सह्याद्रीला धडक दिली आणि सह्याद्रीच्या पाठीवर असलेले गडकोट जिंकण्यासाठी मोघली सरदारांना आज्ञा दिली. ताज्या दमाच्या मुघली सैन्याने मराठ्यांच्या किल्ल्यांना वेढे घातले आणि दमदमे रचून तटाबुरुजांवर तोफगोळ्याचा मारा करू लागले. पण मुघली बादशाह आणि त्याच्या सरदारांचा लवकरच भ्रमनिरास झाला. मराठ्यांनी असा काही प्रतिकार केला की सर्वच आघाड्यांवर मुघल पाठ दाखवून पळून गेले.

साधारण १६८४ च्या शेवटास पेठचा किल्ला घेण्यासाठी मुघली सरदार अब्दुलकादर प्रचंड दारूगोळ्या सहित येऊन वेढा घालून बसला होता, त्याला माणकोजी पांढरे या फितुराची सुद्धा साथ मिळाली. अब्दुलकादरला जुन्नरहून अब्दुलखान दारुगोळा आणि रसद पुरवीत असे. ही माहिती जेव्हा मराठ्यांना मिळाली तेव्हा नारोजी त्रिंबक या शूर मराठा सरदाराने आपल्या तुकडीसह त्याची वाट अडवून धरली. गनिमी काव्याचा उपयोग करून नारोजी त्रिंबकने अब्दुल्खानला हैराण करून सोडले. पण मराठ्यांच्या दुर्दैवाने एका लढाईत नारोजी त्रिंबक आणि त्यांचे अनेक मराठे धारातीर्थी पडले. अब्दुलखानाने नारोजीचे शिर कापून आसपासच्या गावात फिरविले आणि या शूर मराठ्याची विटंबना केली.

अखेर अब्दुलकादरने किल्ल्यावर जोरदार हल्ला चढविला पण त्याचा हा हल्ला मराठ्यांनी परतवून लाविला आणि त्याला त्याच्या छावणीत पिटाळून लाविला. पण या धावपळीचा फायदा उठवीत माणकोजी पांढरेच्या सैन्यातील काही मावळे किल्ल्यात घुसले आणि त्यांनी लगेच कापाकापी करण्यास सुरुवात केली. मोघली सैनिकांनी अखेरीस पेठचा किल्ला काबीज केला

No comments:

Post a Comment