Total Pageviews

Thursday, 5 October 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४१४

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४१४
सूर्याजी पिसाळ - फ़ितूर नव्हेच !
मूळ लेखक : प्रिं.अमरसिंह राणे
संदर्भ : दैनिक पुढारी (बहार ) , रविवार, दि.२८ नोव्हेंबर १९९९ .
लेखन : अभिजीत पाटील
भाग ३
इतिहासकार राजवाडे
इतिहासकार राजवाडे तर सांगतात की, छत्रपती राजाराम कर्नाटकात गेले.रायगड व इतर किल्ले गनिमाने घेतले.त्यावेळी जेधे-देशमुख गनिमास सामील झाले ! पण पुढे या पत्रास राजवाडे टिप देतात की, पत्र विश्वसनीय दिसत नाही ! मोठ्या प्रमाणावर फ़ितुरी होणे असंभव. शिवचरित्र साहित्य खंड १० मधील लेखांक २४ च्या उतार्यांन्वये राजाराम छत्रपतींनी चंदीहुन (जिंजी) नरसोजी गायकवाड रायगडावर असता इतिकादखानास गडावरील हावपालत सांगितली म्हणून त्याचा मुलगा संभाजी गायकवाड देशमुख तपे(तालुका) बिरवाडी याची देशमुखी जप्त केली.गुन्हा तसा गंभीर,पण पुढे ५०० पातशाही होन खंड घेऊन देशमुखी दुमाला केली आहे.
सरदेसाई व राजवाडे दोन्ही खरोखरच मातब्बर इतिहासकार पण त्यांच्याकडून काहीच चुकणार नाही असे कसे म्हणायचे.
सर जदुनाथ सरकार
बंगालचे जागतिक कीर्तीचे इतिहासतद्न्य सर जदुनाथ सरकार १९३१ च्या दरम्यान ओझार्डे येथे आले होते.त्यांनी आत्ताच्या पिसाळ मंडळींची भेट घेतली होती.त्यांच्या चर्चेत सूर्याजी पिसाळांवरचा आरोप खोटा आहे, असे प्रतिपादिले गेले.(इति नरसिंगराव पिसाळ) हिस्ट्री ओफ़ औरंगजेब भाग ४ या त्यांच्या इतिहासग्रंथात सरकारांनी आपले विचार मांडले आहेत.१६८८ डिसेंबरमध्येच आसदखानपुत्र इतिकादखान रायगडकडे निघाला होता.१९ ओक्टोंबर १६८९ मध्ये रायगड घेऊन शिवाजी,संभाजी व राजाराम यांचे परिवारास कैद केले.
चिटणीसांची बखर व इश्वरदास यांचे संयुक्तीक म्हणने असे की, येसूबाई आणि तिचे सल्लागार यांनी बहुदा असे ठरविले असावे की,संभाजींचा म्रुत्यू व राजारामांचे महाराष्ट्राबाहेर जाणे या गोष्टी ध्यानी घेता व महत्वाची बरीच मातब्बर माणसे महाराष्ट्राबाहेर गेली आहेत.अशावेळी रायगडावर असलेल्या सामान्य बिनलढाऊ माणसांचा प्रतिकाराचा यत्न फ़ुकट आह. शांतपणे शरण जाण्यातच शाहू व सर्वांचे कल्याण आहे.फ़ुका मरण व नुकसान यापेक्षा तह समेट योग्य.
मुत्सद्दी राणी येसूबाई
रायगडाबाबत धोरणी,निग्रही व मुत्सद्दी येसूबाईंनी प्रतिकार अशक्य झाल्याने कमीतकमी नुकसान सोसून किल्ला स्वाधिन केला.पुढेही औरंगजेबाच्या स्वारीचा रेटा अन भर ओसरेपर्यंत हे धोरण मरठ्यांनी स्वीकारलेले दिसते. म्हणजे मोठी फ़ितूरी नाही.सूर्याजींचे नावही तेथे नाही.जेधे शकावलीत नोंद ’कार्तिक महिन्यात रायगड झुल्फ़िकारखानाच्या स्वाधिन करण्यात आला.शाहूस (शिवाजी द्वितीय) गडावरुन तुळापुरास औरंगजेबकडे नेण्यात आले.बादशहाने त्यास सहा हजारी मनसबदार केले व शाहू राजे असे नाव ठेवले.आणि त्यास आपल्या ’जाळी’ (तुरुंगात) मध्ये ठेविले.शिवचरित्रप्रदीपमध्ये हे पहिल्या ५० पानात वाचावयास मिळत.खानास राजधानीत खुप द्रव्य सापडले .त्याने सिंहासन फ़ोडले.बंदीवासात प्रतापराव गुजरांचे कुटुंब आणि मुलगा खंडेराव होते.खंडेरावावर धर्मांतराचा प्रसंग आला. नाव बदलले नाही. सुटून दक्षिणेत आल्यावर, म्रुत्यूनंतर त्यांचे व्रुंदावन कसबे परळी येथे बांधिले.सूर्याजींचेवर धर्मांतराचा प्रसंग नंतर आलाच.शिवरायांची एक भार्या व संभाजीची एक मुलगी, मोरोपंत सबनीस, राजाद्न्या, कारकून, कारभारी, कारखानदार असे व विश्वासू नोकर इ. हजार - पाचसे लोक कैद झाले होते.सर्वांच्या खर्चाची व्यवस्था बादशहाने लाऊन दिली.कदाचित राजा पौरसची इतकी व्यवस्था सिकंदराने लावली नसावी ! शाहूंचे लग्न कैदेतच झाले, तेंव्हा रायगडचा पाडाव करून आणलेली शिवाजींची भवानी तलवार त्यांनी शाहूस बक्षीस दिली.

No comments:

Post a Comment