Total Pageviews

Thursday, 3 August 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३१७

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३१७
एक महान सरसेनापती
संताजी घोरपडे
- भाग ५
Written By Nikhil salaskar
राजाराम जिंजी कड़े निसटुन जाताना त्यांना बीदनुरची राणी "चेनम्मा" हिने सहाय्य केले होते. औरंग्जेबास याचा खुप राग आला आणि त्याने जाननिसारखान, मतलबखान, व सर्जाखान यांस फौज देऊन कर्नाटकात त्या राणीचा समाचार घेण्यास पाठवले. पण ही बातमी संताजिस समजता त्यांनी या बादशाही फौजेवर आधीच हल्ला करून तिची धुलाधाण उडविली. साकी मुस्तैद खान याचे दाखले देतो. सर्जाखान हा आदिलशाही सरदार, आदिलशाही अस्ता नंतर तो मोघलांस येउन मिळाला होता. १६९० साली सर्जाखान सातारा किल्ल्यास वेढा देऊन बसला होता. त्याचा वेढा उठवण्या साठी संताजी आणि धनाजी यांनी आपल्या फौजा सातारा आसपास आणल्या. त्यांनी सर्जाखानच्या छावणीवर गनिमी हल्ले चालू केले. अशाच एक लढाइत सर्जाखान आणि त्याचा कुटुंब कबीला मराठ्यांच्या हाती लागला. हजारो मोगल सैनिक कापले गेले. नंतर एक लाख होन घेउन संताजीने सर्जाखानची सुटका केलि. (संदर्भ- जेधे शाकावली). या लढाईचे वृतांत मोगल इतिहासकार ईश्वरदास नागर सुद्धा देतो.खटाव परिसरात संताजी-धनाजी यांनी तर विजयाचा सपाटाच लावला. एका पेक्षा एक मोघल सरदारांना पाणी पाजले. मोगल सैन्यात तर या दोघांचा इतका धाक निर्माण झाला की म्हणे मोगली घोडे पाणी पिण्यास घाबरित कारन त्याना संताजी-धनाजी पाण्यात दिसत. याच दरम्यान राजारामने संताजिंस सेनापती पदावर नियुक्त केले

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३१६

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३१६
एक महान सरसेनापती
संताजी घोरपडे
- भाग ४
Written By Nikhil salaskar
शंभु राजांच्या मृत्यु नंतर मोघलंनी कोकणात मुसंडी मारली. खुद्द रायगडाला विळखा पडला, जुल्फिकार खान याने रायगड आणि आसपासचा परिसर जिंकण्यासाठी पराकाष्ट केले. याच दरम्यान संताजी खर्या अर्थाने एक नेता म्हणुन उदयास आले. त्यांनी राजाराम, ताराराणी, राजसबाई यांस धनाजी बरोबर सुखरूप विळख्यातुन बाहेर काढले. राजाराम राजे प्रतापगड मार्गे वासोटा, पन्हाला करत बेदनुरच्या राणीच्या साह्याने जिंजिंस सुखरूप निघून गेले.येथे महाराष्ट्रात, शंभुराजांच्या मृत्यु आणि मराठ्यांचे राज्य संपणार या धुंधित मोघल गाफिल झाले होते. नेमक्या याच गोष्टीचा फायदा संताजिने घेत खुद्द औरंगजेबाच्या तंबूवरील कळस कापून नेले. संताजीने आपल्या बंधू आणि विठोजी चव्हाण यांच्या साह्याने अवघ्या २००० सैन्यानिशी तुलापुर येथील मोघल छावणीवर हल्ला करुन त्यांची बहुत हानीकरुन सिंहगडावर पसार झाले. (संदर्भ-मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध)नंतर संताजिंनी जुल्फिकार खानावर हल्ला केला. जुल्फिकार त्या वेळेस रायगडाला वेढा घालून बसला होता. या छाप्यात त्यांना बरीच लूट मिळाली, ती घेउन ते थेट पन्हाल्यास असलेल्या राजाराम राजांस भेटले.(संदर्भ-मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध)साधारण १६८९ (नोव्हे- डिसे) या कालात शेख निजाम कोल्हापुरास होता. ह्यास संताजिने युद्धात हरवले, मुकर्रब खान याच युद्धात जबर जख्मी झाला (संदर्भ-मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध) . पुढे त्याचा (मुकर्रब खान) कुठे उलेख सापडत नाही बहूदा तो नंतर या जख्मानमुले मेला सुद्धा असेल.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३१५

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३१५
एक महान सरसेनापती
संताजी घोरपडे
- भाग ३
Written By Nikhil salaskar
म्हालोजी घोरपडे हे शिवाजी महाराजांस आपल्या ५०० स्वरानिशी येउन मिळाले. म्हालोजी हे पुढे पन्हालगडाचे तटसरनौबत होते. शंभुराजे जेव्हा दिलेर खानाकडून निघून आले तेव्हा त्यांची व्यवस्था पान्हाळ्यावर केलि होती आणि सोबतीस म्हालोजी घोरपडे दिले होते. असे कापशीकर घोरपडे घराण्याचा इतिहास सांगतो.संपूर्ण शंभु राजांच्या कारकिर्दीत म्हालोजी घोरपडे हे स्वराज्य राखण्याचे चोख काम करीत होते. शिर्क्यंचे बंड मोडून काढण्याच्या वेळी स्वतः शंभु राजांच्या सोबत म्हालोजी घोरपडे हजर होते. मोगल सरदार मुकर्रब खान जेव्हा संगमेश्वर येथे शंभु राजांस कैद करण्यास पोचला तेव्हा म्हालोजी घोरपडे यांनी लढाई केलि पण ते मारले गेले.संताजी घोरपडे यांचे जन्म साल इतिहासाला माहित नाही पण जयसिंह पवारांच्या अंदाजानुसार साधारण १६४५ असू शकते. चिटणीस बखर सांगते की हंबिररावनच्या हाताखाली जे अनेक वीर होते त्यात एक संताजी घोरपडे होते. अहमदाबाद, बुराण्पुर, जाल्नापुर, सिंदखेड हे मुलुख लुटत हंबिरराव स्वराज्यात आले. हंबिररावनच्या विनंतीवरुन संताजिंस जुमलेदारी दिल्ही.दक्षिण दिग्विजय मोहिमेत कोप्पल प्रांत जिंकणे ही एक महत्वाची योजना होती. कोपल हे अदिल्शाहिचे सरदार हुसैनखान आणि कासिम खान यांचे ठाणे होते. या मोहिमेत हंबिरराव यांनी या पठाण बंधूंचा पड़ाव केला आणि कोपल स्वराज्यात सामील केले. ९१ कलमी बखर सांगते की या युद्धात संताजी आणि बहिर्जी घोरपडे यांनी मोठे रण माजवले.पण जालन्याच्या स्वारित संताजिच्या हातुन काही तरी चुक झाली म्हणुनच महाराजांनी त्यास मुजर्यास न येण्याची शिक्षा ठोठावली असे ९१ कलमी बखर सांगते. जालनाची मोहिम ही महाराजांच्या जिवनातील शेवटची मोहिम, जालना शहर मराठयानी ४ दिवस लुटले पण लूट परत आणताना रणमस्तखान या मोगल सरदाराने हल्ला केला आणि बरीच लूट परत घेउन गेला, या यूद्घात सिधोजी निम्बालकर कामी आले

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३१४

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३१४
एक महान सरसेनापती
संताजी घोरपडे
- भाग २
Written By Nikhil salaskar
भोसले आणि घोरपडे घराणे हे एकाच वृक्षाच्या दोन शाखा. मुळ पुरुष सुजनसिंह हा उदयपुरच्या राजघराण्यातील होता. दक्षिणेत आल्यावर यानी हसन गंगूची सत्ता मजबूत करण्यासाठी पुष्कल मेहनत घेतली. याच सुजनसिंहच्या पणतूस (भैरवसिंह) मुधोल ची ८४ गावांची जहागीर प्राप्त झाली. भैरवसिंह यांस "भुशल धारी" असे संभोदले आहे. भुशल धारी म्हणजेच "भूतलावरिल शस्त्रधारी" म्हणजेच "क्षत्रिय योद्धा". पुढे कालांतराने भुशलचे भुशाल, भुसाल, भोसाल, भोसल, भोसला, भोसले असे हो़त गेले.मालिक उत्तुजरास खेळणा किल्ल्याच्या पायथ्याच्या जंगलात शिर्के आणि शंकरराव मोरे यांच्या फौजांनी हरवले. पण १४६९ साली मंहमद गवान याने कोकणची मोहिम हाती घेतली. यात त्याला भैरवसिंहचा पणतू कर्णसिंह आणि या कर्णसिंहचा पुत्र भीमसिंह यांची मोलाची साथ लाभली. जे सुलतानी फौजेला जमले नाही ते या पितापुत्र जोड़ीने केले. त्यांनी खेळणा किल्ला घोरपडीच्या साह्याने सर केला आणि हा दुर्गम किल्ला बहमनी सुलतानास बहाल केला. या युद्धात कर्णसिंह मारला गेला. तर भीमसिंहंस "राजा घोरपडे बहाद्दर" हा किताब बहाल करण्यात आला त्याच बरोबर घोरपडीच्या रंगाचे निशाण सुद्धा देण्यात आले. (संदर्भ- मुधोल घोरपडे घराण्याचा इतिहास)पुढे भीमसिंहचे वंशज घोरपडे बहाद्दर हे पद नावा नंतर लाऊ लागले. बाहमनी अस्तानंतर दक्षिणेत पाच शह्या निर्माण झाल्या. घोरपडे हे आदिलशाहशी एक निष्ट राहिले याचे कारण बहुतेक त्यांची जहागीर ही आदिलशाहच्या प्रांतात ये़त असावी म्हणुन असावे.चोलराजा हा घोरपडे घराण्याचा वंशज. चोलाराजचा मोठा मुलगा पिलाजी घोरपडे (बजी घोरपडे यांचे आजोबा) हा मुधोल ची जहागीर संभालून होता तर त्याचा दूसरा पुत्र वल्लभजी यांस वाई प्रांतातल्या पाटिलक्या देण्यात आल्या होत्या. याच वल्लभजीचा नातू म्हणजे "म्हालोजी घोरपडे" ज्यांना संगमेश्वरी वीर मरण प्राप्त झाले. आणि याच वल्लभजीचा पणतू म्हणजे सरसेनापती संताजी घोरपडे, ज्यांनी स्वराज्य रक्षणात मोलाची कामगिरी बजावली. (sources- डॉ.जयसिंह पवार)

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३१३

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३१३
एक महान सरसेनापती
संताजी घोरपडे
- भाग १
Written By Nikhil salaskar
महाराजांना एका पेक्षा एक असे सेनापती लाभले तीच परंपरा पुढे शंभुराजांच्या कालात हंबिराव मोहिते यांनी चालू ठेवली.शंभुराजांना आणि कवी कलाशंना संगमेश्वरी शेख निजाम यानि पकडले आणि त्याच वेळेस म्हालोजी घोरपडे मारले गेले. या नंतर मोग्लांनी रायगड घेतला आणि जणू मराठ्यांचे हे राज्य (महाराजांचे दिव्य स्वप्नच) नष्ट होते काय अशी परिस्तिथि निर्माण झाली. पण याच वेळेस महाराजांच्या आणि शंभु राजांच्या तल्मित तयार झालेले काही रणझुंझार पुढे सरसावले आणि याच मराठी भूमीत त्या मस्ताव्लेल्या मोघल बादशाहला गाढ़ला.या योध्यात एक आघाडिचा वीर म्हणजे "सरसेनापती संताजी घोरपडे". मराठ्यांचा इतिहास सेनापती संताजी घोरपडे यांचे नाव न घेता पूर्ण होउच शकत नाही

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३१२

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३१२
अटकेवर झेंडे फडकले तेव्हा...
डॉ. सदानंद मोरे
भाग
ही मेहनत करायचे दादा अर्थातच मनावर घेतल्याशिवाय राहिला नाही, अबदालीच्या शहाजाद्याविरुद्ध शीख सरदार अलासिंग जाट आणि आदिनाबेग मोगल यांनी संघर्ष जारी ठेवला होता. राघोबा त्यांच्या मदतीसाठी लाहोरकडे रवाना झाला. मानाजी पायगुडे व आदिनाबेग थेट लाहोरवर चालून गेले. मराठ्यांची धास्ती घेऊन तैमूरशहा व जहानखान यांनी पलायनाचा मार्ग चोखाळला. ही घटना 20 एप्रिल 1758 रोजी घडली. पळपुट्या पठाणांचा मराठ्यांनी चिनाब नदीपर्यंत पाठलाग केला. आपले सामान तेथेच (वजिराबाद) टाकून पठाणांनी पळण्याचा वेग वाढवला व अटकपार करून काबुल गाठले.
दरम्यान, राघोबाने लाहोरचा कब्जा घेतला. तेथील मोगलांच्या प्रसिद्ध शालिमार बागेतील वाड्यात मराठी सैन्याचा शाही पाहुणचार आदिनाबेगने केला. मोठा दीपोत्सव करण्यात आला. त्यासाठी एक लाख रुपयांचा खर्च झाला.
4 मे 1758ला रघुनाथराव दादाने नानासाहेब पेशव्यांस लिहिलेल्या पत्रातून काही गोष्टींचा स्वच्छ उलगडा होतो.
""लाहोर, मुलतान, काश्मीर वगैरे अटकेअलीकडील सुभ्यांचा बंदोबस्त करून अंमल बसवावा. त्यास काही झाला, काही होणे, तोही लौकरच करितो. तयमूर सुलतान व जहानखान यांचा पाठलाग करून फौज लुटून घेतली. थोडीशी झडतपडत अटकेपार पिशावरास ते पोहचले.''
दरम्यान, अहमदशहा अबदालीचा पुतण्या पुणे दरबारात नानासाहेब पेशव्यांच्या भेटीस गेला होता. अबदालीविरुद्धच्या राजकारणात त्याचा उपयोग करून घ्यावा या उद्देशाने नावाने त्याला राघोबाकडे पाठवला होता. त्यावर राघोबा लिहितो ः ""इकडून जोरा पोहचवून सरकारचा अंमल अटकेपार करावा. त्याचा पुतण्या व दौलतेचा वारस स्वामीपाशी देशास आला, तो स्वामींनी आम्हाकडे पाठवित होता. त्यास अटकेअलीकडे थोडीशी जागा बसावयास देऊन अटकेपार काबूल पिशावरचा सुभा देऊ.''
यांचे मनसुबे आता असे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे होते. त्यांची उमेद रूमशाम उर्फ कॉन्स्टन्टिनोपलपर्यंत झेप घ्यायची होती.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३११

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३११
अटकेवर झेंडे फडकले तेव्हा...
डॉ. सदानंद मोरे
भाग
दरम्यान, यथेच्छ लुटालूट करून अहमदशहा अबदाली काबुलास परतला. शाहजादा तैमूरशहा व जहानखान यांस त्याने लाहोरात ठेवले. पातशहा आलमगिराच्या मुलीशी तैमूरशहाचा निकाह लावून पंजाबचे राज्य त्याच्या नावे चढविण्याचा उपद्‌व्यापही त्याने जाताना केला. हे सर्व निस्तरण्याची जबाबदारी आता मराठ्यांवर आली. त्यासाठी निघालेला रघुनाथराव 11 ऑगस्ट 1757 रोजी दिल्लीदाखल झाला. अबदालीच्या वतीने दिल्लीचा कारभार पाहणाऱ्या नजीबखानास मराठ्यांनी पंधरा दिवसांत जेरीस आणले. विठ्ठल शिवदेव विंचूरकर या सेनानीने नजीबास पकडून दिल्लीचा ताबा घेतला.
दिल्लीतील अबदालीच्या नजीबादि हस्तकांना काढून टाकून पूर्ववत व्यवस्था केल्यानंतर राघोबाने नानासाहेबांस लिहिले ः ""बावीस सुभ्यांपैकी दक्षिण, माळवा, गुजरात, आगरे, अजमीर हे सहा आपणाकडे आलेच आहेत. लाहोर प्रांती अटकपावेतो सहा सुभे अबदालीकडे आहेत. प्रयागचा कराकुडा, अंतर्वेद पहिलीच आपल्याकडे आहे. राहिले चार अयोध्या, बंगाल, पटणे, दिल्ली. त्यात दिल्लीखालील एक करोडीचा मुलूख सरहिंदपावेतो प्रस्तुत तेशी नव्वदपावेतो वसुलीच आहे. पैकी नि महाल दोचौ दिवसांत वाटून मिळतील. बंगालचे दरसाल पातशहास चौपन लक्ष येतात ते व अयोध्या दोन जागे निमेनीम घ्यावे. बाकी जाट तरी आगरे सुभ्यात आला. मेहनत केली तर लाहोरदेखील सुटावयाजोगे आहे.''