Total Pageviews

Friday, 3 March 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २०९

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २०९

छत्रपति शिवरायांचे जाहीरनामे - 'कानून जाबता' ... !
भाग १

ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी, शके १५९६ या दिवशी 'महाराजांनी शिरी छत्र धरले. राजे चक्रवर्ती सम्राट झाले. मराठा राजा छत्रपती जाहला ही गोष्ट सामान्य नाही जाहली.' राजाभिषेकानंतर ३ दिवसात म्हणजे 'ज्येष्ठ वद्य प्रतिपदेस' श्री शिवछत्रपति महाराजांनी ३ जाहीरनामे प्रसिद्द केले. तर चौथा जाहिरनामा राजाभिषेकानंतर १५ दिवसात म्हणजे 'ज्येष्ठ वद्य त्रयोदशीस' घोषीत झाला. हे सर्व जाहीरनामे 'कानून जाबता' म्हणुन ओळखले जातात. थोडक्यात राजाभिषेकानंतर २ आठवडयामध्ये राज्यव्यवहार पद्धती कशी असेल ते छत्रपति शिवरायांनी पूर्णपणे स्पष्ट केले होते. अर्थात आधी सुद्धा हीच राज्यव्यवहार पद्धत अमलात असली पाहिजे; राजाभिषेक हे जाहीर करायला एक निमित्त ठरले असावे.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २०८

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २०८
।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।।
भाग १३
रयतेचा राजा
छत्रपती शिवरायांनी सतराव्या शतकात मुघली सत्तेला आव्हान देत एक स्वतंत्र राज्य घडविले.शिवरायांमुळे त्या काळातील हिंदूस्थानातील जनतेत स्वातंत्र्याची लाट आली.छत्रपती शिवरायांनी हिंदू धर्माचे,संस्कृतीचे रक्षण केले पण त्यांनी इतर धर्माचा पण तेवढाच आदर केला.छत्रपतींच्या आरमारात इब्राहिमखान,दौलतखान हे सर्वोच्य पदावर होते.सिद्दी हिलालने आपल्या पाच पुत्रासह पन्हाळगडाच्या लढाईत मोठा पराक्रम गाजविला.सिद्दी इब्राहिम हा अफजलखान भेटीच्या वेळी छत्रपतींच्या अंगरक्षकापैकी एक होता.काझी हैदर हा शिवाजीराजांचा खास सचिव व वकील होता.मदारी मेहतर हा शिवरायांचा विश्वासू नोकर होता.दर्यासारंग हा छत्रपतींच्या आरमाराचा पहिला सुभेदार होता.शिवरायांच्या तोफखान्यातील जवळपास सर्व गोलंदाज(तोफची)मुसलमान असत.त्यामुळे छत्रपती शिवराय हे केवळ हिंदूचे राजे नव्हते तर ते सर्व रयतेचे राजे होते हे सिध्द होते.छत्रपती शिवरायांनी इस्लामी राजसत्तेशी संघर्ष केला पण इस्लामी प्रजा तसेच इतर धर्मीयांशी ते आपूलकीने वागले,या महान राष्ट्रपुरूषाला आज आपण धर्माच्या चौकटीत अडकवून ठेवणे कीतपत योग्य आहे ?,याचा खरोखर गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात जिजाबाईंचे निधन झाले.अशा वेळी शोकमग्न न होता छत्रपतींनी वेगवेगळ्या मोहिमा आखल्या. कर्नाटकची प्रसिध्द मोहिम ही त्यापैकी एक होय.
कर्नाटकच्या मोहिमेवरून परत आल्यानंतर छत्रपतीं आजारी पडले व शके १६०२ रुद्रनाम संवत्सरे चैत्र शुद्ध पौर्णिमा, हनुमान जयंती, दि. ३ एप्रिल १६८० या दिवशी महाराजांचे निधन झाले.सभासद च्या बखरीत पुढीलप्रमाणे उल्लेख आहे.ते दिवशी पृथ्वीकंप जाहला.गगनी घूमकेतू उदेला.उल्कापात आकाशाहून जाला.रात्री जोड-इंद्रधनुष्ये निघाली.अष्टदिशा दिग्दाह होऊन गेल्या.श्रीशंभुमहादेवी तळ्याचे उदक रक्तांबर जाले.पाण्यातील मत्स्य बाहेर पडून अमासवणी उदक जाहाले.ऐशी अरिष्टें जाहाली.मग राजियाचे कलेवर चंदनकाष्टें व बेलकाष्टें आणून दग्ध केलें
छत्रपतींच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंगावर हजारो पाने अपुरी पडतील,पुढील कालात मी सविस्तरपणे याबद्दल लिहिणार आहे.
।। प्रौढप्रतापपुरंदर कुळवाडीभुषण,बहुजनप्रतिपालक,
क्षत्रीयकुलावतंस सिंहासनाधिश्वर महाराजाधिराज राजा
शिवछत्रपती की जय।।
छत्रपति शिवरायांची रायगडावरील समाधी
सांभार; ;http://www.marathidesha.com/

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २०७

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २०७
।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।।
भाग १२
छत्रपतींचा राज्याभिषेक
सर्वसामान्य रयतेला न्याय देण्याकरिता सर्वोच्य सत्ताकेंद्र निर्माण करणे आवश्यक होते.तसेच राज्याभिषेक करून त्यांना स्वतंत्र राज्याची स्थापना करावयाची होती.राज्याभिषेकाची तयारी कित्येक महिने रायगडावर चालू होती.राज्याभिषेक सोहळ्यावेळी काही तथाकथित अतिविद्वान धर्मपंडितांनी आणि महाराजांच्या अष्टप्रधान मंडळीतील काही लोकांनी महाराजांच्या क्षत्रियपणाबद्दल प्रश्न उपस्थित केले.शेवटी बाळाजी आवजी यांनी राजस्थानातील उदयपूरला जाऊन,महाराज हे सिसोदिया राजपूत वंशाचे आहेत हे सिध्द केल्यानंतर अष्टप्रधान मंडळीचा विरोध मावळला.नोकर राजांच्या क्षत्रियपणाबद्दल प्रश्न उपस्थित करतो यापेक्षा मराठेशाहीचे दुर्दैव ते कोणते? असाच प्रकार कोल्हापूरच्या राजर्षि शाहू महाराजां संदर्भात झालेला आहे,त्याचे सविस्तर वर्णन राजर्षि शाहूंच्या लेखात आहे.
सन २९ मे १६७४ पासून राज्याभिषेकासाठी विविध धार्मिक कार्यक्रम होऊ लागले.मुख्य राज्याभिषेकाचा सोहळा ६ जून इ.स.१६७४(शालिवाहन शके १५९६ ज्येष्ठ,शुद्ध त्रयोदशी,आनंदनाम संवत्सर)रोजी रायगडावर संपन्न झाला.तर २४ सप्टेंबर १६७४,ललिता पंचमी अश्विन शु.५ आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वत:ला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला. सभासदाच्या बखरीत या सोहळ्याचे खूप सुंदर वर्णन आहे.सभासदाच्या लेखानुसार या सोहळ्यात एक करोड बेचाळीस लक्ष होन एवढा खर्च झाला.राज्याभिषेक समारोहाबद्दल सभासद म्हणतो,येणे प्रमाणे राजे सिंहासनारूढ जाले.'या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाहा मर्हाटा पातशहा येवढा छत्रपती जाला.ही गोष्ट काही सामान्य जाली नाही.'
श्री शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा राजधानी रायगडावर झाला.त्याचे पडसाद सातासमुद्रापार युरोपपर्यंत निनादले.हा राज्याभिषेक रोखायचे धाडस आलमगीर औरंगजेबालाही झाले नाही.राज्याभिषेक सोहळा सुरु असताना,स्वराज्याच्या सीमेकडे डोळा वर करुन पहायचे धाडसही चार पातशाह्यांना झाले नाही.इतका प्रचंड दरारा आणि दहशत शिवरायांची,त्यांच्या मराठी सेनेची होती. राज्याभिषेकावेळी शिवरायांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले.राज्यव्यवहार कोश बनविला,नवी दंडनिती,नवे कानुजाबते तयार केले.
छत्रपति शिवरायांचे रायगडावरील शिल्प
सांभार ;http://www.marathidesha.com/

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २०६

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २०६
।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।।
भाग ११
सांभार :www.marathidesha.com
किल्ल्यावर अचानक हल्ला केल्यामुळे मुघल सैनिकांत गोंधळ माजला.किल्ल्यावर मोठी हातघाईची लढाई झाली.किल्लेदार उदयभान राठोड व तानाजी मालुसरे यांच्यात मोठी लढाई झाली.लढताना हातातील ढाल तुटल्यामुळे तानाजीने डाव्या हातावर शेला गुंडाळून त्यावर तलवारीचे वार झेलेले.
शेवटी दोघेही जखमी झाल्यामुळे खाली कोसळले.तानाजी धारातीर्थी पडल्यामुळे मराठी मावळ्यांमध्ये गोंधळ उडाला,याचवेळी सूर्याजी मालुसरे आणि शेलारमामा यांनी मुख्य दरवाज्यातून प्रवेश करून निकराची लढाई करून किल्ला काबीज केला.रात्रीच्यावेळी गडावरील गवताच्या गंज्या पेटवून राजगडावर छत्रपतींना किल्ला जिंकला गेल्याचा इशारा दिला.कोंढाणा इ.स.४फेब्रुवारी,१६७०रोजी मध्यरात्री मराठ्यांच्या ताब्यात आला. कोंढाण्याचे संपूर्ण युध्द हे रात्री झाले.
सभासदाच्या बखरीत या युध्दाचा पुढीलप्रमाणे उल्लेख आहे.तानाजी मालुसरा म्हणून हजारी मवळियांचा होता.त्याने कबूल केले की,'कोंडाणा आपण घेतो',असे कबूल करुन वस्त्रे,विडे घेऊन गडाचे यत्नास ५०० माणूस घेऊन गडाखाली गेला.आणि दोघे मावळे बरे,मर्दाने निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढवले.गडावर उदेभान रजपूत होता.त्यास कळले की,गनिमाचे लोक आले.ही खबर कळून कुल रजपूत कंबरकस्ता होऊन,हाती तोहा बार घेऊन,हिलाल (मशाल),चंद्रज्योती लावून बाराशे माणूस तोफाची व तिरंदाज,बरचीवाले,चालोन आले.तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर रजपुतांचे चालून घेतले.मोठे युद्ध एक प्रहर झाले.पाचशे रजपूत ठार जाले.उदेभान किल्लेदार खाशा त्याशी व तानाजी मालुसरा यांशी गाठ पडली.दोघे मोठे योध्दे,महाशूर,एक एकावर पडले.तानाजीचे डाव्या हाताची ढाल तुटली.दुसरी ढाल समयास आली नाही.मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करुन त्याजवर वोढ घेऊन,दोघे महारागास पेटले.मोठे युध्द झाले,एकाचे हातें एक तुकडे होऊन फिरंगीच्या वारें पडले.दोघे ठार झाले.
मग सुर्याजी मालूसरा(तानाजीचा भाऊ),याने हिंमत धरून,कुल लोक सावरुन उरले राजपूत मारिले.किल्ला काबीज केला.आणि गडावर पागेचे खण होते त्यांस आग लाविली,त्याचा उजेड राजियांनी राजगडाहून पाहिला आणि बोलले की,'गड घेतला,फत्ते जाली'!असे जाहालें.तों जासूद दूसरे दिवशीं वर्तमान घेऊन आला कीं,'तानाजी मालसुरा यांनी मोठे युध्द केलें.उदेभान किल्लेदार यास मारिले आणि तानाजी मालसुरा पडला.'असें सांगितलें.गड फत्ते केला असें सांगताच राजें म्हणूं लागले की,'एक गड घेतला,परंतू एक गड गेला!'असे तानाजीसाठीं बहूत कष्टी जाहाले.
कोंढाणा किल्ला जिंकल्याची बातमी छत्रपतींना समजल्यानंतर अत्यंत दु:खी झालेल्या राजांनी"गड आला पण सिंह गेला"असे उद् गार काढले.त्यांनी कोंढाण्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.छत्रपतींनी आपल्या या सवंगड्याचे शव उमरठ या तानाजींच्या गावी पाठविले,ज्या मार्गावरून तानाजींचे शव गेले,तो मार्ग 'मढेघाट' या नावाने ओळखला जातो.आपल्या धन्याच्या वचनाला जागून किल्ला ताब्यात घेणारा तानाजी खरोखरच सिंह होता.
सिंहगडावरील तानाजी मालुसरे यांचे स्मारक

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २०५

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २०५
।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।।
भाग १०
सांभार :www.marathidesha.com
कोंढाणा सिंहगडाची लढाई
आग्र्याहून सुटल्यानंतर छत्रपती शिवरायांनी मोठ्या मोहिमा आखून मुघलांच्या ताब्यातील तेवीस किल्ले घेण्याचे ठरविले.सुरूवातीला त्यांनी कोंढाणा किल्ला घ्यायचे ठरवले.कारण कोंढाणा किल्ला स्वराज्यातील मध्यवर्ती किल्ला होता,या किल्ल्याच्या साह्याने बारा मावळावर ताबा ठेवणे शक्य होते.कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी तानाजी मालुसरे यांनी आपल्या शिरावर घेतली.
रायगड जिल्ह्यातील उमरठ(पोलादपुरजवळ)गावचे असणारे तानाजी मालुसरे यांचे मुळ गाव सातारा जिल्ह्यातील,जावळी तालुक्यातील गोडोली होय.तानाजी मालुसरे छत्रपतींचे बालपणीचे सवंगडी होते.आपला मुलगा रायबा याच्या लग्नात व्यस्त असलेल्या तानाजींनी ,"आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे" असे म्हणत कोंढाणा ताब्यात घेण्याचा विढा उचलिला.
कोंढाण्याचा किल्लेदार उदयभान राठोड हा एक शूर राजपूत होता.त्याच्या दिमतीला १५०० हशमांची फौज होती.४ फेब्रुवारीच्या रात्री(माघ वद्य नवमी)राजगडावरून निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करून सिंहगडाच्या पायथ्याला पोहचले.दिवसासुध्दा चढण्यास अवघड असणारा द्रोणगिरीचा कडा तानाजींनी कोंढाण्यावर चढाईसाठी निवडला.भयाण काळोखी रात्री मर्द मावळे दोरखंडाच्या साह्याने द्रोणगिरीचा कड्यावरून वर चढू लागले.कडा चढत असताना दोर तुटून कित्येक मावळे दरीत पडले पण शेवटी पाचशेवर मावळे कढा चढण्यात यशस्वी झाले.
द्रोणागिरी कडा(सिंहगड),याच मार्गाने तानाजी मालुसरे
आपल्या मावळ्यासह दोरखंडाच्या साह्याने कोंढाण्यावर चढले होते

दुर्गाबाई :- छत्रपती संभाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी ?

 

दुर्गाबाई :- छत्रपती संभाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी ?
 लेखन आणि संकलन :- नागेश मनोहर सावंत देसाई
छत्रपती संभाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी महाराणी येसूबाई या सर्वाना परिचित आहेत. परंतु काही संदर्भ साधनातून दुर्गाबाई या संभाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी असाव्यात याविषयी काही नोंदी संदर्भ साधनातून आढळून येतात. सदर लेखात संदर्भ साधनात आढळून येणाऱ्या दुर्गाबाई यांच्याविषयीच्या काही नोंदी आणि त्याची चिकित्सा.
  • • संभाजीराजे यांचा दुसरा विवाह
मोगल इतिहासकर भीमसेन सक्सेना इ.स. १६७५ साली पुढीलप्रमाणे नोंद करतो “ अली आदिलशहाच्या मृत्यूनंतर त्याचे मुलुख आपल्या ताब्यात आणण्याची शिवाजीने इच्छा केली. अकलूजच्या ठाण्यावर रणमस्तान हा मोगल ठाणेदार होता. जाधवराय दखनी याचा पुतण्या रुस्तमराव हा रणमस्तान याजपाशी तैनात होता. शिवाजीने रुस्तमरावाच्या मुलीशी आपला मुलगा संभाजी याचे लग्न ठरविले. जाधवराव दखनी आणि हिलालखान हे मोगलांना सोडून त्याला ( शिवाजी महाराजांना ) मिळाले होते.
मोगल इतिहासकार भीमसेन सक्सेना शिवाजी महाराजांनी रुस्तमराव जाधव याच्या मुलीशी संभाजीराजांशी विवाह ठरविला अशी नोंद करतो परंतु हा विवाह कोणत्या साली झाल्याच्या नोंदी आपणास संदर्भ साधनातून आढळून येत नाहीत. तसेच सदर मुलीचे नाव यात येत नाही. या विषयी अन्य कोणत्याही संदर्भ साधनात माहिती आढळून येत नाही.
  • • संभाजीराजे दिलेरखानाच्या छावणीत
१३ डिसेंबर १६७८ संभाजी महाराज रागवून व नाराज होऊन दिलेरखानास मिळाले. ९१ कलमी बखर , बसातीन – उस – सलातीन , चिटणीस बखर याच्या नोंदीनुसार संभाजीराजे दिलेरखानाच्या भेटीस गेले तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची पत्नी व काही स्वार बरोबर होते. संभाजीराजे स्वराज्यात परत आले त्यावेळी ते त्यांच्या पत्नीसह स्वराज्यात आल्याचे संदर्भ आढळतात .
९१ कलमी बखरीतील नोंद :- त्या उपर संभाजीराजे भेटले हे वर्तमान पतशाहास टाक ( डाके ) दाखल झाले. दिलेरखानानेही लिहून पाठवले होते . त्यावरून हुजुरची तलब आबादी आले. जे संभाजीराजे त्याबराबर फौज देवून बळकटीने हुजूर पाठवणे . हे तलब येताच संभाजीराजे यांजबरोबर फौज देवून रातोरात स्त्रीसह वर्तमान पळविले.
चिटणीस बखरीतील नोंद :- संभाजीराजे अनुताप होऊन स्त्रीसहवर्तमान युक्तीने निघोन आले.
बसातीन – उस – सलातीन :- संभाजी यांनी फुरसतीची वेळ पाहून आपले स्त्रीस पुरुषाचा पोषाख पांघरून शुराचा वेष देवून पाच स्वारानिशी आपले स्त्रीसुद्धा दिलेरखानाचे लष्करातून पळाला.
संभाजीराजे दिलेरखानाच्या छावणीत गेले त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी होती असा उल्लेख वरील उत्तरकालीन साधनातून येतो तसेच संभाजीराजे स्वराज्यात परत आले त्यावेळी त्यादेखील स्वराज्यात परत आल्या . परंतु त्या पत्नी कोण त्याचं नाव काय याबाबत मात्र काही माहिती आढळून येत नाही.
येसूबाई यावेळी शृंगारपुरात होत्या त्यांना भवानी नावाची कन्या झाली. जेधे शकावलीतील नोंदीनुसार “ ४ सेप्टेम्बर १६७८ बुधवारी रात्री २०/४४ शृंगारपुरी भवानीबाई लेक संभाजी राजे यासी झाली.” येसूबाई स्वराज्यात शृंगारपुरास आपल्या माहेरी असताना संभाजी महाराजांनबरोबर असलेली त्यांची दुसरी पत्नी कोण ?
  • • दिलेरखानाच्या कैदेत संभाजीराजांची बायको व बहिण असल्याच्या नोंदी :-
औरंगजेबाच्या दरबाराच्या अखबरीतील नोंद २७ नोहेंबर १६८१ : - सीवाचा मुलगा संभा याची एक बायको व बहिण यांना पूर्वी दिलेरखानाने कैद केले होते त्यांना या किल्यात ( अहमदनगर ) ठेवले आहे. म्हणून शत्रूचे लोक ह्या किल्याभोवती आले. त्यांचा त्यांना किल्यातून बाहेर काढण्याचा विचार आहे .
ऑगस्ट १६८४ मासिरे आलमगिरी मधील नोंदीनुसार “बहादूरगडाचा किल्लेदार अब्दुर रहमान याचा शिक्का असलेली संभाच्या दोन पत्नी , एक मुलगी व तीन दासी , कैदेत असल्याची पोचपावती बादशाह समोर ठेवली गेली.
  • • दिलेरखानाच्या कैदेतून दुर्गाबाई यांची सुटका करण्याचे प्रयत्न :-
ताराबाई कालीन कागदपत्रे खंड १ यादव घराण्यातील पत्रातील नोंदीनुसार संभाजीराजे व गिरजोजी यादव यांनी दुर्गाबाई यांना सोडवण्याचे प्रयत्न केले.
ताराबाई कालीन कागदपत्रे खंड १ ( पत्र १४३ दिनांक २८-११-१७०३ छत्रपती शिवाजी राजे दुसरे यांजकडून गिरजोजी यादव यांना मिळालेली सनद ) :- मातोश्री दुर्गाबाईसाहेब ताम्राचे निर्बंधी दौलताबादेस होती. त्यांचे वर्तमान न कळे तेव्हा प्ररामार्श करावयास संभाजीराजे काका यांणी तुम्हास पाठवले . तेथे तुम्ही जावून जीवाभ्य श्रम करून संकट प्रसंगात त्यांची भेटी घेऊन येऊन वर्तमान श्रुत केले.
ताराबाई कालीन कागदपत्रे खंड १ ( पत्र ३२२ दिनांक ०५-१०-१७१६ निवाडापत्र ) :- गिरजोजी यादव हे मातोश्री दुर्गाबाईसाहेब राजेश्री संभाजी राजे छत्रपती यांची राणी दौलताबादेस तांब्राचे निर्बंधी होती . तिथे धन्याच्या आज्ञेप्रमाणे जाऊन परमसंकटे त्याची भेटी घेऊन त्यास काढून आणावयाचा येत्न योजून येऊन वर्तमान धन्यास सांगितले.
ताराबाई कालीन कागदपत्रे खंड १ ( पत्र ३६१ दिनांक २३-०९-१७२० कोल्हापूर छत्रपती संभाजी महाराज दुसरे ) :- “ त्या उपरी मातोश्री दुर्गाबाई साहेब ताम्राचे निर्बंधी दौलताबादेस होती. त्यांचे वर्तमान न कळे. त्यांचा परामर्श करावयास राजश्री संभाजीराजे यांनी आपणास पाठविले. तेथे संकट प्रसंगात जाऊन त्यांची भेटी घेऊन आलो. ते समयी राजश्री संभाजीराजे व कवी कलश समागमे असता आपण येऊन दुर्गाबाई यांचे वर्तमान सांगितले. “
वरील साधनाचा विचार करता अस्सल पत्रांच्या आधारे दिलेरखानाच्या कैदेत संभाजीराजांच्या पत्नी कैदेत होत्या. परंतु दिलेरखान प्रकरण वगळता अन्य कोणत्याही मार्गाने त्या मुघलांच्या कैदेत कशा सापडल्या असतील याच उत्तर मिळत नाही.
  • • छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलींचे लग्न
१६ जून १७०३ च्या बातमीपत्रात औरंगजेबाने मुगलखान राहदार यास आज्ञा केली : नरकवासी संभा ( संभाजी राजे ) याच्या मुली बहादूरगडाच्या तळावर आहेत त्यांना हुजुरात आणावे.
५ मार्च १७०४ च्या बातमीपत्रातील नोंद “नरकवासी संभा ( संभाजी राजे ) याची मुलगी हिला बहादूरगडावरून आणण्यात आले होते. तिचे लग्न फकीर मुहमद शाहूर याच्या बरोबर करण्याचे ठरवले. फकीर मुहमदला बादशहाने खिलातीची वस्त्रे दिली.
२४ एप्रिल १७०४ च्या बातमीपत्रातील नोंद “नरकवासी संभा ( संभाजी राजे ) यांच्या मुलीचे लग्न फकीर मुहमद शाईर याच्याबरोबर ठरवण्यात आले होते. ते बदलण्यात आले. आता तिचे लग्न सिकंदरखान मरहुम ( विजापूरचा शेवटचा बादशहा सिकंदर आदिलशाह ) याचा मुलगा मोईयोद्दीन याजबरोबर ठरविण्यात आले. त्याला खिलातीची वस्त्रे देण्यात आली.
८ जून १७०४ च्या बातमीपत्रातील नोंदीनुसार “ सदर लग्न औरंगजेबाच्या उपस्थित हुकुमानुसार पार पडले.
सदर मुलगी हि दुर्गाबाई यांची असावी असा तर्क करता येतो परंतु त्यास ठोस संदर्भ नाहीत.
  • • दुर्गाबाईचे स्वराज्यात आगमन
छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूर हत्तेनंतर थोरले शाहू महाराज व राजपरीवर मोगली कैदेत होता. छत्रपती थोरले शाहू महाराज स्वराज्यात परतले. शाहू महाराजानी १७१९ मध्ये चौथाई व सरदेशमुखीच्या सनदा आणण्यासाठी मराठा सैन्य दिलीस पाठवले शंकराजी मल्हार , बाळाजी विश्वनाथ यांनी केलेले अकबराच्या मुलाचे एक खोटे नाटक व दिल्लीतील राजकीय व लष्करी संघर्ष यामुळे छत्रपतींच्या परिवाराची मोगली कैदेतून सुटका झाली. शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांना बादशहाकडून कोणत्या सनदा घ्यावयाच्या आहेत याविषयीची यादी दिली त्यातील एक मुख्य कलम “मातोश्री व मदनसिंग देखील व दुर्गाबाई, जानकीबाई व सेवक लोक मागोन घेणे “
स्वराज्यात परत आल्यानंतर दुर्गाबाई यांच्या बाबतीत कोणतीही विश्वसनीय माहिती आढळून येत नाही.
  • • दुर्गाबाई आणि जाधव घराणे
दुर्गाबाई या जाधव घराण्यातील होता अशी मांडणी काही इतिहास अभ्यासक करताना दिसतात परंतु त्यास ठोस संदर्भ नाही. मोगल दरबाराच्या बातमीपत्रात सेतू माधवराव पगडी मोगलांतर्फे लढणाऱ्या मराठा सरदारांच्या नावाची यादी देतात त्यात एक नाव सिंद्खेडचे जाधव.
एप्रिल मे १६९४ जगदेवराव जाधवराव यांना ३००० जात व २००० स्वार अशी मनसब मोगल सैन्यात होती. सप्टेम्बर १७०० रोजी औरंगजेबाच्या ब्रम्हपुरी छावणीत त्यांचा मृत्यू झाला.
जगदेवराव जाधवराव यांचा पुत्र मानसिंग जाधवराव याला ७०० जात व ६०० स्वार अशी मनसब मोगल सैन्यात होती.
जगदेवरावचा भाऊ रुस्तमराव याला पाचशे जात व शंभर स्वार अशी मनसब होती त्यात १०० जात व १०० स्वार अशी वाढवण्यात आली.
रुस्तमरावचा मुलगा बहादूरजी ( जाधव ) हा मुगलखान यांच्या फौजेत तैनात होता.
१५ जून १७०४ छत्रपती शाहू महाराजांचे लग्न बहादूरजी ( जाधव ) यांच्या मुलीशी करण्यात आले.
जाधवराव घराणे मोगली सैन्यात सरदार होते . त्यांनी त्यांच्या घराण्यातील मुलीला औरंगजेबाच्या कैदेतून सोडवण्यासाठी प्रयत्न केले असते. परंतु असे कोणतेही प्रयत्न झालेले दिसून येत नाहीत.
  • • निष्कर्ष आणि शक्यता
१ ) भीमसेन सक्सेना शिवाजी महाराजांनी जाधवांच्या घराण्यातील मुलीशी संभाजी महाराज्यांचा विवाह ठरवला होता अशी नोंद करतो परंतु तो विवाह संपन्न झाला का याची नोंद आपणास कोणत्याही साधनात आढळून येत नाही. तसेच त्या मुलीचे नाव देखील कुठे नमूद केलेले नाही.
२ ) दिलेरखानाच्या छावणीत संभाजी महाराज गेले असताना त्यांच्यासोबत त्यांची पत्नी होती व त्या परत स्वराज्यात आल्या अशी नोंद उत्तरकालीन बखरीत आढळून येते. औरंगजेबाच्या दरबारातील नोंदीनुसार संभाजीराजांची बायको व बहीण दिलेरखानाच्या कैदेत होती. संभाजी महाराज व दिलेरखान भेट प्रकरण वगळता अन्य कोणत्याही मार्गाने संभाजीराजांची बायको व बहीण मुघलांच्या कैदेत कशा सापडल्या असतील याच उत्तर मिळत नाही
३ ) संभाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव हे दुर्गाबाई होते हे आपणास यादव घराण्यातील पत्रातील नोंदीत आढळते . संभाजीराजे व गिरजोजी यादव यांनी दुर्गाबाई यांना सोडवण्याचे प्रयत्न केले.
४ ) छत्रपती संभाजीराजे यांच्या एका मुलीचे लग्न विजापूरचा शेवटचा बादशहा सिकंदर आदिलशाह याच्याशी केले परंतु ति मुलगी दुर्गाबाई यांची असावी यास ठोस संदर्भ नाहीत.
५) दुर्गाबाई या जाधव घराण्यातील असल्याचे कोणतेही ठोस संदर्भ आढळून नाहीत. जाधव घराणे मोगल सैन्यात मनसबदार होते त्यामुळे त्यांनी आपल्या घराण्यातील कैदेत असलेल्या मुलीस सोडवण्याचे प्रयत्न केले असते परंतु असे कोणतेही प्रयत्न दिसून येत नाहीत.
६ ) ४० वर्ष मोगली कैदेत राहिल्यानंतर स्वराज्यात दुर्गाबाई परत आल्या परंतु पुढे त्यांच्याविषयी काहीही आढळून येत नाही.
७ ) छत्रपती राजाराम महाराज यांच्या विवाहाच्या नोंदी आढळून येतात. मग संभाजी महाराजांच्या दुसऱ्या विवाहाची नोंद कोणत्याही संदर्भ साधनात का आढळून येत नाहीत. दुर्गाबाई या पत्नी असव्यात की नाटकशाळा ? याविषयी संभ्रमावस्था आहे.
लेखन आणि संकलन :- नागेश मनोहर सावंत देसाई
संदर्भ :- मोगल आणि मराठे :- सेतू माधवराव पगडी
९१ कलमी बखर ,चिटणीस बखर
बसातीन – उस – सलातीन ( विजापूरची आदिलशाही ) :- वा.सि.बेंद्रे
मासिरे आलमगिरी
ऐतिहासिक फार्सी साहित्य खंड ६ औरंगजेबाच्या दरबाराचे अखत्यार ,
ताराबाईकालीन कागदपत्रे खंड १
मोगल दरबाराची बातमिपत्रे :- सेतू माधवराव पगडी

Wednesday, 1 March 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २०३

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २०३
।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।।
भाग ८
सांभार :www.marathidesha.com
आग्र्याहून ऐतिहासिक सुटका
छत्रपतीच्या आयुष्यातील अनेक प्रसंग नाट्यमय घटनांनी भरलेले आहेत त्यापैकी एक म्हणजे आग्र्याहून सुटका होय.या घटनेत छत्रपतीनी दाखवलेल्या समयसूचकता आणि चाणाक्षपणामुळे आजवरच्या महान योद्धे तसेच सेनानीमध्ये,त्यांचे इतिहासातील स्थान वेगळे गणले गेले आहे.
इ.स. १६६६ साली छत्रपती पुरंदरच्या तहाच्या अटीनुसार औरंगझेबला भेटण्यासाठी दिल्लीला गेले.तेथे औरंगझेबने छत्रपतींचा अपमान करून राजांना आग्र्याला नजरकैदेत ठेवले.अशा वेळी राजेंनी आजारी पडण्याचे नाटक करून बरे होण्यासाठी गोरगरिबांना,मंदिराना मिठाईचे पेटारे पाठविण्यास सुरूवात केली.सुरूवातीला मोघलांचे सैन्य पेटारे योग्य प्रकारे तपासत,नंतर ते तपासण्यास आळसपणा करू लागले.या संधीचा फायदा घेऊन छत्रपती वेषांतर करून बाहेर गेले.यावेळी हिरोजी फर्जंद,मदारी म्हेतर यांनी मोठी कामगिरी बजावली(छत्रपती आग्र्याहून कसे सुटले याबद्दल इतिहासकारांमध्ये वादविवाद आहे).
आग्र्याहून सुटल्यानंतर संभाजीराजांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना विश्वासू लोकांकडे सोपवून,छत्रपती वेशांतर करून वेगळ्या मार्गाने महाराष्ट्रात आले.तर काही दिवसांनी संभाजीराजे आले.
छत्रपती शिवरायांनी याच आग्रा किल्ल्यातून सुटका करून घेतली होती