Total Pageviews

60,693

Saturday, 22 October 2016

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ७८


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ७८

इचलकरंजी, सं स्था न.

व्यंकटराव ना रा य ण रा व उ र्फ दा दा सा हे ब. -

इचलकरंजीकरांकडून धारवाड सुभा काढून तो दुस-या मामलेदाराकडे पेशव्यांनीं दिला होता. सुमारें सोळा वर्षेपर्यंत तो सुभा त्यांजकडे होता. त्यां अवधींत मामलतीसंबंधीं तफावत रहातां रहातां आजपर्यंत सरकारची बाकी बरीच तुंबली होती. सरकारचा तगादा उठविण्यासाठीं अनूबाईंस पुण्यास जावें लागलें. व्यंकटरावदादा त्याजबरोबर या खेपेसहि गेले होते. तेथें गेल्यावर हिशेब होऊन मुत्सदी व पेशवे यांजवळ अनुबाईंनीं बहुत रदबदली केल्यावरून शेवटीं यांजवळ अनुबाईंनीं बहुत रदबदली केल्यावरून शेवटीं ७३००० रूपयांवर तोड झाली. पेशव्यांची स्वारी कर्नाटकच्या मोहिमेस निघाली तेव्हां व्यंकटरावांसह अनूबाई पुण्याहून निघून जेऊरच्या मुक्कामीं लष्करांत जाऊन पोंचल्या. तेथें चार दिवस रहावयाचा त्यांचा बेत होता, परंतु इचलकरंजीस तात्यांस देवाज्त्रा झाल्याचें वर्तमान कळतांच त्या व व्यंकटराव तेथून ताबडतोब निघून इचलकरंजीस आल्या.

No comments:

Post a Comment