हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ५१
सरदार आटोळे भाग घराण्याचा इतिहास
धनगर संघजनसमूहातील 'शेगर/सेंगर' नामक जमातीमधील योध्यांनी महाराष्ट्रामध्ये मोठा पराक्रम गाजवलेला दिसून येतो. 'शेगर' जमातीमधील आडनावांच्या 'कुल/गोत्र' संबंधी काहीही माहिती सध्यातरी माझ्याकडे उपलब्ध नाही. आटोळे घराणे हे शेगर जनसमूहातील पराक्रमी घराणे असून आटोळे आडनावाची उत्पत्ती शितोळे, पाटोळे अश्या हटकर जनसमूहातील आडनावाप्रमाणे दिसून येते.
* प्रस्तुत माहिती हि श्री. संतोषराव पिंगळे यांच्याकडून प्राप्त झालेली आहे.
खतोजी आटोळे नावाच्या पराक्रमी पुरूषाने स्वकर्तबगारी व पराक्रमाच्या जोरावर शिवछञपतींकडून सरदारकी मिळवली. खतोजी आटोळे यांचे पूर्वजांना प्रांत सुपे बारामती येथे ४ गावांची पाटीलकी वंशपरंपरेने हकदार असल्याच्या ऐतिहासिक कागदपञांतून नोंदी मिळतात. मराठ्यांच्या स्वतंञसंग्रामात मोघली फौजांचे आतोनात नुकसान करण्याचे कामी आटोळे यांनी चोख भूमिका पार पाडल्याचे दिसून येते. एका जुन्या ऐतिहासीक पोवाड्यात संताजी घोरपडे यांनी मोघलांना खेळवावं. नेमाजी शिंदे यांनी लुटावं. तर सरदार आटोळे यांनी मोघलांचे वाटोळे करावे अशा आशयाच्या वाक्यरचना पहायला मिळतात.
या काळात आटोळे घराण्यातील ज्या पराक्रमी वीर पुरूषांची नावे ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये सनदांमध्ये व सरंजामपञांमध्ये वाचायला मिळतात ती अशी-
१ खासा सुभानजी बिन जावजी आटोळे
२ बजाजी बिन तुकोजी आटोळे
३ सयाजी बिन अंतोजी आटोळे
४ पुंजाजी आटोळे
या सर्वांना स्वतंञ सरंजाम बहाल करण्यात आला होता. तर खासा सुभानजी यांना "समशेरबहाद्दर", बजाजी यांना "सेनाबारासहस्ञी" तर पुंजाजी यांना "यशवंतराव " हे किताब बहाल करून त्यांचा गौरव करण्यात आलेला होता. यावरून असे लक्षात येते की जावजी ,तुकोजी,अंतोजी व पुंजाजी हे भाऊ असावेत व सरदार खतोजी आटोळे यांचे पुञ असावेत. अशा तर्काला वाव मिळतो. पुढे शाहू छञपतींनी सुभानजी यांच्यामृत्यूनंतर त्यांचे पुञ संताजी यांना "धुरंधर समशेरबहाद्दर" किताब दिल्याची नोंद मिळते.
माहिती सौजन्य- श्री. संतोषराव पिंगळे

No comments:
Post a Comment