Total Pageviews

Friday, 3 March 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २१९

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २१९
शंभूसिंग उर्फ संभाजी जाधव
लखोजीराव जाधव आणि त्यांच्या मुलांचा निजामशाहने दगा करून खून केला त्यावेळी त्यांचे सुपुत्र अचलोजी हे हि हा हल्ल्यात मृत्यू पावले होते. त्यानंतर अचलोजी यांचे सुपुत्र संताजी जाधव यांचे संगोपन माँसाहेब जिजाऊ यांनी पुणे येथे केले. संताजी जाधव यांच्या मृत्यूनंतर त्यांचे सुपुत्र शंभूसिंग उर्फ संभाजी जाधव हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबतच मोठे झाले. त्यांचा जन्म साधारण १६४० सालचा असावा. शंभूसिंग उर्फ संभाजी जाधव यांचा पहिला उल्लेख येतो तो १६५९ यासाली अफजलखान वधाच्या प्रसंगी जे दहा लोक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत होते त्यामध्ये शंभूसिंग उर्फ संभाजी जाधव हे एक होते. पन्हाळगडाला जेंव्हा सिद्दीजोहरने वेढा घातला होता त्यावेळी देखील शंभूसिंग उर्फ संभाजी जाधव हे देखील या वेढ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत अडकले होते. रात्री किल्ल्यातून छत्रपती महाराजांबरोबर शंभूसिंग जाधव हे देखील वेढ्यातून बाहेर पडले. पुढे सिद्दी जोहर आणि फाजलखानच्या सैन्य तुकड़ी यांच्याविरुद्ध जे युद्ध झाले यातच शंभूसिंग उर्फ संभाजी जाधव हे धारातीर्थी पडले. हे शंभूसिंग उर्फ संभाजी जाधव म्हणजे मोगलांना पळताभुई करून सोडणाऱ्या मराठा साम्राज्याचे सरसेनापती धनाजीराव जाधव यांचे वडील होत ..
स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे स्वामिनिष्ठ शंभूसिंग उर्फ संभाजी जाधव यांना मानाचा मुजरा !!
पोस्ट -राज जाधव

No comments:

Post a Comment