Total Pageviews

Saturday, 4 March 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २२१


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २२१
*"बाजी बांदल", "रायाजी बांदल" -
इतिहासातील निसटलेली पाने*
लेखक : Nitinkaka Aashish Bandal
मरण मारुनी पुढे निघाले गर्व तयांचा कोण हरी ?
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ?
"सिद्दी जौहर" ने पन्हाळा गडाला घातलेल्या वेढ्यातून निसटून,
१३ जुलै १६६० रोजी "छत्रपती शिवाजी महाराज" हे पन्हाळा गडावरून विशाळगडाकडे निघाले,
तेव्हा वाटेत गजापूरच्या खिंडीत गानिमाने त्यांना गाठले.
महाराज विशाळगडाकडे निघाले आणि खिंडीत गनिमाला रोखून धरण्यासाठी आपले काही मावळे पुढे सरसावले.
त्या मावळ्यांचे नेतृत्व करत होते "कृष्णाजीराजे नाईक-बांदल" यांचे चिरंजीव "बाजी बांदल" व "रायाजी बांदल".
हे दोघेही भोर तालुक्यातील "हिरडस मावळ" मधील "पिसावारे" गावचे.
छत्रपती शिवरायांनी त्यांना त्या भागातील ५३ गावची वतनदारी दिली होती.
या दोघा भावांनी आपल्या तलवारीच्या जोरावर गनिमाला खिंडीत रोखून धरलं.
त्यांच्या सोबतीला होते "बाजी प्रभू देशपांडे" जे "बांदल" यांच्याकडे "चिटणीस / कारकून" म्हणून काम करत होते.
तसेच त्यांच्या बरोबर "गुंजन मावळ, हिरडस मावळ आणि रोहीड खोरे" मधील इतरही काही मावळे होते.
त्यात प्रामुख्याने शिंदे, गव्हाणे, चव्हाण, विचारे, खाटपे, सडे, धुमाळ, जाधव, शेलार, जगदाळे, भेलके, इंगळे, शिरोळे आणि इतर काही मावळ्यांचा समावेश होता.
"बाजी बांदल", "रायाजी बांदल" आणि त्यांच्या साथीदारांनी महाराज विशाळगडावर पोचेपर्यंत खिंड लढवत ठेवली आणि ती पावन केली.
या खिंडीमध्ये "बाजी बांदल", "रायाजी बांदल", "वीर बाजीप्रभू देशपांडे" आणि इतर काही मावळे धारातीर्थी पडले.
बांदल बंधूंच्या या पराक्रमामुळे नंतर शिवाजी महाराजांनी स्वत: "बांदल" यांच्या "पिसर्वे" येथील घरी जाऊन त्यांच्या मातोश्री "श्रीमती दिपाही बांदल" यांचे सांत्वन केले आणि "मानाचं दुसरं पान (तलवार)" त्यांना इनाम म्हणून दिलं.
(मानाचं पाहिलं पान "जेधे" यांना अगोदरच मिळालं होतं)
"बांदल" यांच्या तुकडीमध्ये जे सैन्य होतं त्या तुकडीचा उल्लेख स्वत: छत्रपती शिवरायांनी "बांदल सेना" असा केला असल्याचा पुरावा तत्कालीन पत्रव्यवहारामध्ये आहे.
*राहुल पवार*
*मराठा फोर्टस*
*दुर्गभ्रमंती व दुर्गसंवर्धन,करमाळा*
📞9527729090
9552800893
संदर्भ:-
कु संदिप खाटपे
हिरडस मावळ खोरे
भोर पुणे.

 

No comments:

Post a Comment