हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २२६
हा मराठा सरदार ठरवायचा दिल्लीचा बादशहा, पानीपतनंतर पुन्हा मिळवून दिली प्रतिष्ठा
भाग १
पानीपतच्या तिसऱ्या लढाईनंतर मराठी साम्राज्याला पुन्हा नव्याने उभारी मिळवून देण्याचे काम करणाऱ्या महादजी शिंदे यांनी मराठा साम्राज्याचे महान सरदार म्हणून ओळखले जाते. त्यांच्या करारी बाण्यामुळेच इंग्रजांनी त्यांना द ग्रेट मराठी म्हणून संबोधले होते. मराठी साम्राज्याला एका वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या या योद्ध्याचा आज स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा धावता आढावा घेण्याचा केलेला हा प्रयत्न...
पानीपत युद्धानंतर (1761) उत्तरेतील मराठी सत्तेला मोठा हादरा बसला. त्यावेळी अगदी मराठा सत्ता लयाला जाईल अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शिंदे, होळकर, पवार असे नवे सरदार निर्माण झाले होते. उत्तरेत पुन्हा मराठ्यांची सत्ता स्थापन करण्याचे काम या सरदारांनी केले. या मराठासरदारांपैकी महादजी शिंदे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. दिल्लीचा बादशहा कोण असावा याबाबत महादजी निर्णय घेत असे म्हटले जाते. एवढे सामर्थ्य महादजी शिंदे यांच्यात होते.
महादजी सुभेदार राणोजी यांचा अनौरस पुत्र होता. वयाच्या दहाव्या वर्षापासून तो वडिलांबरोबर रणांगणा जात होता. दहाव्या वर्षी वरात येथील युद्धात तोसहभागी झाला होता. राणोजी शिंदे आणि त्यांच्या मोठ्या मुलाच्या मृत्यूनंतर पेशवा दरबाराने महादजी शिंदे यांच्या पराक्रमाची दखल घेऊन त्यांच्याकडे शिंदे दौलतीचा कारभार सोपवला होता.
शिंदे दौलतीचा कारभार ताब्यात मिळाल्यानंतर महादजी शिंदे यांनी 1769 ते 1792 या कालखंडातच उत्तर भारतात यशस्वी मोहिमांचे आयोजन करून महादजी शिंदे यांनी शिंद्यांचे स्वतंत्र असे अस्तित्त्व निर्माण केले. पानीपतच्या युद्धात गमावलेली मराठ्यांची प्रतिष्ठा पुन्हा प्राप्त करून देत महादजी शिंदे यांनी मोघल बादशहास आपल्या वर्चस्वाखाली आणले होते. त्यांच्या कालखंडात उत्तर भारतात पुन्हा
मराठ्यांच्या साम्राज्यास झळाळी मिळाली होती
No comments:
Post a Comment