Total Pageviews

Saturday, 4 March 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २२३


 हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २२३
अंताजी माणकेश्वर -
भाग १

उत्तर हिंदुस्थानांतील पेशव्यांचा एक सरदार ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मण. आडनांव गंधे. नगरजिल्ह्यांतील कामरगांवचा जोशीकुळकर्णीं. जावळी प्रकर्णांतील राघोबल्लाळ अत्रे याचा नातु त्रिंबकपंत अत्रे हा अंताजीपंताचा मावसभाऊ असल्यानें त्याच्या आश्रयास अंताजी कर्हेपठारप्रांतीं आला. त्रिंबकपंत वारल्यावर त्याच्या मुलांचा प्रतिपाळ व वतनीगांवचा कारभार अंताजी व त्याचा वडील भाऊ हरि हे करूं लागले. अंताजी हा शाहूच्या पदरीं प्रथम उदयास आला. नंतर तिकडून पेशव्यांकडे बदलला. यानंतर १७५३ पर्यंतची त्याची हकीकत समजत नाहीं. त्यावेळीं त्यानें दिल्लीस बादशहास मदत केली. तिच्या बद्दल त्याल इटावा व फुफुंद हे दोन परगणे जहागीर मिळाले.

अंताजी पेशव्यांच्या तर्फे दिल्लींत फौज घेऊन होता, त्याचें व वकील हिंगणे यांचें पटत नव्हतें. त्याचें बीज असें कीं, अंताजी थोडासा स्वत:ची प्रौढी मिरविणारा असून तो परभारें वजिराशीं वगैरे उलाढाली करूं लागला. हा प्रकार हिंगण्यास सहन झाला नाहीं. इ. स. १७५२-५३ त शिंदे होळकर दक्षिणेंत असल्यामुळें एकटा अंताजी पेशव्यांची पांच हजार फौज घेऊन पातशहाच्या संरक्षणासाठीं दिल्लीस होता. अंताजीनें फौज वाढविली तिला आगाऊ परवानगी घेतलेली नव्हती आणि तिच्या खर्चास पैसा नसून तारांबळ उडाली होतीं. पेशव्यानें अंताजीचा बंदोबस्त २०।१०।१७५३ रोजीं करून दिलां (ना. रो ६९) अंताजी माणकेश्वराच्या कामगिरीचे उल्लेख (रा. खं. ६, १४९. १८९. २०१) वगैरे ध्यानांत ठेवण्याजोगे आहे.

हिंगण्याबरोबरील तंट्यास मूळ कारण अंताजी माणकेश्वर असून, पैशावरून अंताजीशीं हिंगण्यांचा तंटा इ. स. १७५० पासूनच वाढत गेला (६.४७९). कुंभेरीहून दिल्लीवर चाल करण्याच्या प्रसंगी हा तंटा कळसास पोंचला होता. दामोधर महादेव पेशव्यास लिहितो, 'पातशाही तोफखाना (कुंभेरीवर) आणावयाची आज्ञा श्रीमंतीं केली. त्यास येथून तेथें 'लिहावें, अर्ज करावा, तो वकील पदरचा करितात ऐसें अंताजींना सांगावें तेणेंकरून काम होणेस दिरंगाई पडावी. अंताजीपंताचे सांगितल्यावरी हा मजकूर व्हावासा नाहीं. परंतु अंताजीपंत सखारामपंत व्याही; सखारामपंत श्रीमंतांचें दिवाण, श्रीमंत बज्यास्वामीच ! असा प्रकार तेथें दर्शवून अंताजीपंत बोलतील तें आमचें बोलणें समजावें ऐसें सखारामपंतीं त्यांचें निदर्शनास आणून दिल्हें. याजकरितां आतां आम्हांस आज्ञा न करावी. ''सखारामबापू व अंताजीपंत व्याही आणि रघुनाथराव भोळा व सखारामबापूच्या मुठींत, हा प्रकार पुष्कळांस जाचक झाला.

No comments:

Post a Comment