हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ११८
विजयाराजे शिंदे ते ज्योतिरादित्य शिंदे :
या नंतर ग्वाल्हेरचे शिंदे राजघराणे
नाममात्र राजेशाहीचे राहिले पण स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या राजकरणात
सक्रिय राहिले. विजयाराजे शिंदे भाजपकडून सक्रिय राहिल्या तर त्यांचे पुत्र
माधवराव शिंदे हे काँग्रेसकडून सक्रिय राहिले. माधवरावांच्या अकाली
मृत्युनंतर त्यांचे पुत्र आताचे काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य शिंदे
यांच्या हाती शिंदे घराण्याची सूत्रे आहेत. राजस्थानच्या मुख्यमंत्री
वसुंधराराजे ह्या विजयाराजे शिंदे यांच्या कन्या आणि माधवरावांच्या कनिष्ट
भगिनी अन ज्योतिरादित्य यांच्या आत्या होत. आजच्या घडीलाही शिंदे घराणे
भाजपा आणि काँग्रेस यांच्यात दुभंगलेले पहायला मिळते. काल २५ जानेवारी
२००१ला राजमाता विजयाराजे शिंदे यांचे वार्धक्याने देहावसान झाले होते,
स्वातंत्र्यपूर्व काळातला शिंदे घराण्याचा अखेरचा दुवा निखळला होता.
आपल्या मराठी मातीचा अंश घेऊन उत्तर भारतात पुढे गेलेले, मराठ्यांचे नाव
इतिहासात अजरामर करणारे हे घराणे राजकारणाच्या दलदलीमुळे आज दुभंगलेल्या
अवस्थेत आहे ही क्लेशदायक गोष्ट आहे. कारण शिवछत्रपतींचा वारसा पुढे
चालविणारे महाराष्ट्रातील भोसले घराणे (सातारा - कोल्हापूर) देखील
राजकारणामुळे एकसंध दिसून येत नाही. उर्वरित कुठलेही मातब्बर सरदार घराणे
आज वैभवशाली अवस्थेत दिसून येत नाही. तत्कालीन अनेक मराठा सरदार घराणी आजही
अस्तित्वात आहेत पण त्यांची अवस्था बडा घर अन पोकळ वासा अशी झाली आहे, तर
काहींची नाके गेली पण भोके शिल्लक राहिली अशी गत झाली आहे...त्यातल्या
त्यात ग्वाल्हेरच्या शिंद्यांनी आजही आपले वैभव टिकवून ठेवले आहे हीच काय
ती समाधानाची बाब !
- समीर गायकवाड.
संदर्भ : शिंदे घराण्याचा इतिहास - सरंजामे,
मराठी साम्राज्याची छोटी बखर - मोडक जनार्दन बाळाजी,
नाना फडणवीस - मॅकडोनल्ड,
फॉल ऑफ द मुघल एम्पायर - एच जे किन.

No comments:
Post a Comment