हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ९
फलटण संस्थान
बजाजी निंबाळकर आणि त्याचा वंश
भाग ९
फलटण संस्थान
बजाजी निंबाळकर आणि त्याचा वंश
इ.स.१६६१ च्या पावसाळयानंतर आदिलशहा कर्नाटकांतील बंडें मोडण्याकरितां
त्या प्रांतीं गेला तेव्हा बजाजी त्याच्याबरोबर होता. इ.स. १६६५
(नोव्हेंबर) त मोंगल व शिवाजी राजे यांचें संयुक्त सैन्य विजापुरच्या
मोहिमेवर निघालें. तेव्हां त्यांनीं प्रथम बजाजीपासून फलटण, व ताथवडयाचा
किल्ला घेतला. हीं ठाणीं पुढें १० वर्षांनीं बजाजींनें मोंगलांपासून परत
घेतलीं. बजाजीची मदत शिवाजी राजास गुप्तपणे असे. बजाजीच्या मुसुलमान बायकोस
मूल झाल्याचें दिसत नाहीं. हिंदु स्त्री सावित्रीबाई हिला महादजी, मुधोजी व
वणगोजी (तिसरा) अशीं मुलें होतीं. महादजी हा शिवाजी राजांचा जांवई असून
त्याचा एक सरदार होता. तो बहुश: कर्नाटकाकडे असे. संभाजी राजांना त्याची
चांगली मदत झाली. संभाजी राजांचा वध झाल्यावर औरंगझेबानें या नवराबायकोस
पकडून ग्वाल्हेरीच्या किल्ल्यावर हयातीपर्यंत कैदेत ठेविलें. शिवाजी
राजांनी मोजे वाल्हें (जिल्हा पुणें) येथील पाटिलकी जांवयास आंदण दिली
होती. महादजीचा पुत्र बजाजी (दुसरा) हा स. १७७४ पर्यंत हयात होता. महादजीचा
धाकटा भाऊ मुधोजी. त्याचा मुलगा बजाजी (तिसरा) यास राजाराम छत्रपतीची
मुलगी सावित्रीबाई दिली होती पहिला बजाजी स१६७६ च्या सुमारास वारला त्यावर
त्याचा तिसरा पुत्र वणगोजी (१६७६-९३) गादीवर आला; याची विशेष माहिती आढळत
नाहीं. त्याच्यानंतर जानोजीस (१६९३-१७४८) गादी मिळाली. हा पेशव्यांस मिळून
मिसळून वागे. त्याचा मुलगा मुधोजी (तिसरा-१७४८-६५) यानें (तिस-या) मालोजांस
दत्तक घेतलें. मुधोजीच्या पश्चात दत्तकाबद्दल भांडण होऊन, सखारामबापू
यांच्या सल्ल्यानें पेशव्यानीं फलटणास जप्ती पाठविली. त्या वेळीं
मुधोजीच्या सगुणाबाई नांवाच्या स्त्रीनें जप्तीवाल्यांशी लढाई केली तेव्हा
पेशव्यानीं जहागीर जप्त करून ती मुधोजी बिन बजाजी एका भाऊबंदाकडे चालविली.
बाई त्राग्यानें ६ वर्षें बालेघाटी जाऊन राहिली. पुढें जेजुरीस पुन्हां
दत्तकाची चौकशी होऊन व पेशव्यानां लाख रुपये नजर देऊन मालोजीनें जहागिरीचा
ताबा मिळविला (१७७४). मालोजी हा पेशव्यांबरोबर चाकरीस असे व जहागिरीचा
कारभार सगुणाबाई करीत असें. या घराण्यांत ही बाई फार प्रख्यात झाली. मालोजी
हा कर्नाटकांत हरिपंततात्याच्याबरोबर असतां वाख्यानें मेला (१७७७).
त्यानें जानराव यास दत्तक घेतलें होतें. जानराव हा बापाप्रमाणेंच
पेशव्यांच्या सैन्यांत असे व सगुणाबाईच जहागिरीचा कारभार पाही. ती स.१७९१ त
वारल्यावर, जानराव स्वत: कारभार पाहूं लागला. तो स. १८२५त वारला. त्यावर
त्याची बायको साहेबजीबाई हिनें स.१८५३ पर्यंत कारभार केला. तिनें मुधोजीराव
बापूसाहेब यांनां १८४० त दत्तक घेतलें. त्यानां स. १८६० त संस्थानचा
अधिकार मिळाला. त्यानीं पुष्कळ वर्षें राज्य केलें. त्यानीं संस्थानांत
ब-याच सुधारणा केल्या. फलटणास पाणीपुरवठयाची योजना केली, मोफत शिक्षण सुरू
केलें. हल्ली (१९२५ नोव्हेंबर) त्यांचे दत्तक चिरंजीव श्री मालोजीराव
नानासाहेब हे गादीवर आहेत. (इसं; फलटणची हकीकत; वाड-कैफियती; डफ; म. रि. म.
वि. २)
No comments:
Post a Comment