Total Pageviews

60,693

Sunday, 7 August 2016

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ६

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ६
फलटण संस्थान
फलटण संस्थान- मुंबई, सातारा जिल्ह्यांतील एक जहागीर. येथील जाहागीरदाराचें आडनांव निंबाळकर. मुख्य गांव फलटण. जहागिरीच्या उत्तरेस नीरा; पूर्वेस सोलापूर जिल्हा; दक्षिणेस माण, व खटाव तालुके; पश्चिमेस वाई व कोरेगांव हे तालुके. एकदंर गांवे ७२ आहेत क्षेत्रफळ ३९७ चौरस मैल व लोकसंख्या (१९२१) ५५९६६. उत्पन्न २ लाख रु. इंग्रज सरकारास ९६०० रु. खंडणी जाते. जहगिरीतींल उत्तरेचा नीराथडीचा प्रांत सुपीक व दक्षिणेचा डोंगराळ आहे. पाऊस फार कमी पडतो. हवा उष्ण आहे. ज्वारी, बाजरी, तूर, हरभरा ही मुख्य पिंके होत. नीरा व बाणगंगा या मोठ्या नद्या.
इतिहास- महाराष्ट्रांतील राजघराण्यांत फलटणच्या निंबाळकराचें घराणे फार जुनें असून सुमारे सहा सातशें वर्षें तें राज्योपभोग घेत आहे. धारच्या परमार रांजावर दिल्लीच्या सुलतानांनीं पुन्हां पुन्हां हल्ले केले, त्या धामधुमींत निंबराज परमार नांवाचा एक पुरुष दक्षिणेंत फलटणनजीक शंभुमहादेवाच्या रानांत सन १२४४ च्या सुमारास येऊन राहिला. निंबराज ज्या गावीं राहिला त्यास निंबळक आणि त्यावरून त्याच्या वंशास निंबाळकर अशें नाव पडले. निंबराजाच्या वंशजांनी पुढे फलटण हें गाव वसविलें आणि तेथें ते वतन संपादून राहूं लागले. महंमद तुघ्लखाच्या वेळेस ह्यांस 'नाईक' हा किताब व फलटणची देशमुखी मिळाली. पुढें आदिलशाहींत निंबाळकराचें महत्त्व विशेष वाढलें. निंबराजापासून चवदावा पुरुष वणंगपाळ उर्फ जगपाळराव म्हणून झाला, त्याच्या पूर्वीची माहिती उपलब्ध नाहीं.

No comments:

Post a Comment