हिंदुस्तानातील मराठे आणि
त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २०१
।। रयतेचा राजा
शिवछत्रपती ।।
भाग ६
सांभार :www.marathidesha.com
मुघलांशी संघर्ष
इ.स.१६६३ साली मुघल
साम्राज्याचा नर्मदा नदी पलीकडे विस्तार करण्यासाठी त्याचबरोबर छत्रपती
शिवरायांच्या राज्यविस्ताराला वेसण घालण्यासाठी औरंगझेबाने त्याचा मामा
शाहिस्तेखान याला दख्खनच्या मोहिमेवर पाठविले.हजारो सैन्य,प्रचंड मोठा लवाजमा सोबत घेऊन शाहिस्तेखान दख्खनला
निघाला.दख्खनला जात असताना मध्ये वाटेत लागणार्या प्रत्येक गावा-गावात त्याने
दहशत पसरवीत मोठा विध्वंस केला.पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील
छत्रपती शिवरायांच्या लाल महालात खानाने तळ ठोकला.
खानाचे सैन्य रोजच
आजूबाजूच्या गावा-गावामध्ये जाऊन लुटालूट करत.खानाच्या रूपाने एक मोठे संकट
स्वराज्यावर चालून आले होते.खानाला धडा शिकविणे गरजेचे होते.समोरासमोरच्या युध्दात
मराठ्यांचा टिकाव लागणे शक्य नव्हते,अशा वेळी छत्रपतींनी लालमहालावर हल्ला करून खानाला धडा शिकविण्याचे
ठरविले.राजांना लाल महाल नवा नव्हता,त्यांचे लहानपण लालमहालातच गेले होते त्यामुळे लालमहालातील कोपरा न कोपरा
त्यांना माहीत होता.
लालमहालाभोवती खानाच्या
शेकडो सैनिकांचा बंदोबस्त होता.अशावेळी अंधार्या रात्री लग्नाच्या वरातीचा आधार
घेऊन राजे व काही निवडक मावळे वेशभूषा बदलून महालात घुसले .लालमहालात मराठ्यांनी
कत्तल आरंभिली सगळीकडे गोंधळ चालू झाला,छत्रपती खानाच्या शामियानात शिरले .ऱाज्यांना प्रत्यक्ष समोर पाहून खानाची
पाचावर धारण बसली,जीव
वाचविण्यासाठी खानाने खिडकीतून उडी मारली,छत्रपतींचा चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाची तीन बोटे तुटली गेली.खान
बचावला गेला पण शिवरायांची दशहत मनात बसल्यामुळे तो मराठी मुलूख सोडून गेला.या
प्रकरणामुळे मुघलांची बेइज्जत झाली तर शिवरायांचे नाव हिंदूस्थानभर झाले.
हिंदुस्तानातील मराठे आणि
त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
No comments:
Post a Comment